For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा विमानतळावर विशेष फ्लाईंग स्क्वॉडची नियुक्ती

10:53 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांबरा विमानतळावर विशेष फ्लाईंग स्क्वॉडची नियुक्ती
Advertisement

निवडणूक अधिकारी शकीलअहमद यांची माहिती

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. तीन ठिकाणी चेकपोस्ट  उभारण्यात आले आहेत. सांबरा विमानतळावर विशेष फ्लाईंग स्कॉड नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे साहाय्यक निवडणूक अधिकारी, बुडा आयुक्त सी. डब्ल्यू. शकीलअहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील जुन्या महानगरपालिकेच्या तहसीलदार कार्यालयात त्यांचे कार्यालय प्रारंभ करण्यात आले आहे. याठिकाणी ते बोलत होते. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 294 मतदान केंद्रे आहेत. 2 लाख 62 हजार 589 मतदार आहेत. 1,31,813 पुरुष, 1,30,766 महिला मतदार आहेत. तर 10 तृतीयपंथी मतदार आहेत. 2,235 सरकारी सेवेतील मतदार आहेत. यामध्ये 2,183 पुरुष, 52 महिला मतदार आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी 25 सेक्टर अधिकारी, 4 एफएसटी पथक, 2 व्हीएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाची, बेकिनकेरे आणि राकसकोप येथे तीन चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी तहसीलदार सिद्राय भोसगी म्हणाले, चार पोलीस स्थानके या मतदारसंघाच्या व्याप्तीत येतात. त्यामुळे कोणत्याच अनुचित घटनेला थारा देऊ नये, याची सूचना करण्यात आली आहे. तर फ्लाईंग स्क्वॉडच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. तसेच सांबरा विमानतळ ग्रामीण मतदारसंघाच्या व्याप्तीत येते. याठिकाणी नियमित येणाऱ्या विमानांसह विशेष विमानांचीही ये-जा असते. याठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी विशेष फ्लाईंग स्क्वॉडची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.