For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

स्कोपमनच्या जागी हरेंद्र सिंगची नियुक्ती?

06:55 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कोपमनच्या जागी हरेंद्र सिंगची नियुक्ती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाच्या शर्यतीमध्ये हरेंद्र सिंगचे नाव आघाडीवर असून लवकरच त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते. यापूर्वी भारतीय महिला हॉकी संघाला स्कोपमन हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले होते.

हरेंद्र सिंग यांनी यापूर्वी प्रमुख प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली होती. 2021 साली अमेरिकेच्या पुरूष हॉकी संघाचे ते प्रमुख प्रशिक्षक होते. हॉकी इंडियाने इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच घेतल्या आहेत. भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघाच्या स्थितीची त्यांना पुरेशी कल्पना निश्चितच असल्याने त्यांची प्रमुख प्रशिक्षकपदी निवड केली जाईल, अशी चर्चा हॉकी वर्तुळामध्ये सुरू आहे. हरेंद्र सिंग यांनी काही दिवसांपूर्वी आपली मुलाखत देण्यासाठी हॉकी इंडियाच्या कार्यालयात उपस्थित झाले होते, अशी माहिती हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी दिली. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी एकूण 12 अर्ज हॉकी इंडियाकडे दाखल झाले होते. प्रमुख प्रशिक्षकासाठी क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार मासिक 3 लाख रुपयांचे वेतन दिले जाते. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघ पात्र न ठरल्याने हॉकी इंडियाने दुसरा प्रशिक्षक नियुक्त करण्याचे ठरविले आहे. 2014 साली भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाचे हरेंद्र सिंग प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2016 साली भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने लखनौ येथे झालेल्या पुरूषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते. दरम्यान त्यानंतर हरेंद्र सिंग यांची भारताच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी 2017 साली नियुक्ती केली होती. 2017 साली झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक पटकाविले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.