kolhapur : मतदार यादीसाठी 500 बीएलओंची नियुक्ती
महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आज प्रशिक्षण
कोल्हापूर : महापालिका निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी ५०१ बीएलओंची नियुक्ती केली आहे. यासर्व बीएलाओना आज महापालिकेच्या ताराराणी सभागृहात प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघनिहाय बीएलओंची विभागणी केली असुन २८ ऑक्टोबरपर्यंत त्यांना मतदार यादीचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून यावर हरकती, सूचना घेऊन २८ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. मनपा प्रशासनाने प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. चार विभागीय कार्यालयांतर्गत महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आज प्रशिक्षण २८ ऑक्टोबरपर्यंत काम करावे लागणार पूर्ण मतदार यादीचे काम चालणार आहे.
चार सहाय्यक आयुक्त, चार उपशहर अभियंतावर जबाबदारी दिली आहे. गुरुवारी सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंता, पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण झाले. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शनानुसार प्रारुप मतदार यादी कशा प्रकार करायची याची माहिती दिली. यावेळी अतिरक्त आयुक्त रविकांत अडसुळ, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड यांनी मार्गदर्शन केले.