For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्रे देणार

04:23 PM May 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्रे देणार
Advertisement

पालकमंत्री नितेश राणेंचे आश्वासन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नोकरी मिळण्याबाबत कार्यवाही करावी असे निवेदन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मस्त्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना आज मंत्रालयात देण्यात आले . यावेळी महाराष्ट्र शासन या बाबत सतर्क असून तसे निवेदन नगर विकास मंत्रालयाच्या वतीने मागील अधिवेशनात केले आहे. त्यामुळे लवकरच सावंतवाडी नागरपरिषदेतील सफाई कमगारांना नोकरी देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले . दरम्यान , सावंतवाडी नगरपरिषद कौन्सिलने एकमताने सफाई कामगारांना त्वरित नोकरी देण्याचा ठराव मंजूर केला असून आपल्या पुढील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्रे दिली जातील अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी शिष्टमंडळाला दिली . शिष्ठमंडळाने आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सफाई कामगारांचे वारस प्रतिनिधी सर्वश्री गोपाळ नामदे, सुनील नारायण परब, संदीप भागू पाटील, नितीन सदानंद कदम आदी उपस्थित होते .

Advertisement

Advertisement
Tags :

.