For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

06:22 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
51 000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान
Advertisement

रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांकडून भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 11 व्या रोजगार मेळाव्यात देशातील 51,000 हून अधिक नवीन उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले. व्हर्च्यअल माध्यमातून अनेक सरकारी विभागांमध्ये 51 हजाराहून अधिक लोकांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारच्या एम्प्लॉयमेंट फेअर इनिशिएटिव्हला पाठिंबा देणाऱ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.

Advertisement

गेल्या वषी म्हणजेच 22 ऑक्टोबर 2022 रोजी देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात असताना पहिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रोजगार मेळा उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने 2023 अखेर 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत झालेल्या 11 रोजगार मेळ्यांमध्ये देशातील लाखो लोकांना नियुक्तीपत्रे किंवा जॉइनिंग लेटर मिळाले आहेत.

नुकतेच नियुक्तीपत्रे प्राप्त करणारे नवीन कर्मचारी गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, महसूल विभाग, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, संरक्षण मंत्रालयासह कामगार मंत्रालय आणि मंत्रालयासह केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालये आणि विभागांमध्ये ऊजू होतील. देशभरातून निवडलेल्या या नव्या भरतींना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडेही पाठवले जाईल.

पंतप्रधानांकडून नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित केले. भारत सरकारचे कर्मचारी या नात्याने तुम्हा सर्वांना मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. तुम्ही कोणत्याही पदावर असलात, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तुमच्या देशवासीयांचे जीवन सुसह्य असणे हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे मार्गदर्शन पंतप्रधानांनी केले. भारत सरकारकडून देशातील लाखो तऊणांना नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज 50 हजारांहून अधिक तऊणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे तुमच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो, असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.