71 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदांया हस्ते नियुक्तीपत्र जारी : सदैव शिकण्याची तयारी ठेवण्यी साना : स्वतःला विद्यार्थी मानत असल्यी टिप्पणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या रोजगार मेळा योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 71 हजार जणांना नियुक्तीपत्र जारी केले आहे. विविध राज्यांशी संबंधित या तरुण-तरुणींना केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. यासंबंधीच्या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सामील झाले. मी स्वतःला नेहमीच एक विद्यार्थी मानत आलो आहे. मला सर्वकाही येते आणि आता काहीच शिकण्याची गरज नसल्याचा विचार मी कधीच करत नाही. सर्वकाही शिकलोय असा विचार तुम्ही देखील करू नका. शिकण्याची सदैव तयारी ठेवा असे पंतप्रधानांनी संबंधित उमेदवारांना उद्देशून म्हटले आहे. भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पूर्ण जग कोरोनात्तर मंदीचा सामना करत असताना बहुतांश देशाच्या अर्थव्यवस्थांचा आकार कमी होत आहे. तरीही जग भारताकडे एक चमकणारा बिंदू म्हणून पाहत आहे. सध्या तरुणाईसमोर अनेक अशी क्षेत्रे खुली झाली आहेत, जी 10 वर्षांपूर्वी तरुण-तरुणींसमोर उपलब्ध नव्हती. स्टार्टअपचे उदाहरण आमच्यासमोर असून यावरून देशातील तरुण-तरुणींमध्ये जबरदस्त उत्साह आहे. स्टार्टअप्सनी 40 लाखाहून प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. ड्रोन सेक्टरमध्येही हेच चित्र दिसून येत आहे. मागील 8-9 वर्षांमध्ये देशाच्या क्रीडाक्षेत्राचाही कायापालट झाल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
आत्मनिर्भर भारत मोहीम
‘आत्मनिर्भर भारत’चा विचार अन् दृष्टीकोन हा स्वदेशीचा अवलंब आणि ‘व्होकल फॉर लोकल’पेक्षा अधिक मोठा आहे. गावांपासून शहरांपर्यंत रोजगाराच्या कोटय़वधी संधी निर्माण करणारी ही मोहीम आहे. सध्या आधुनिक उपग्रहापासून सेमी हायस्पीड रेल्वेपर्यंत भारतातच निर्मित होत आहेत. 2014 पूर्वीच्या काळात रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यास 7 दशकांचा कालावधी लागला होता. 2014 नंतर आम्ही 9 वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केल्याचा दावा मोदींनी केला आहे.
संरक्षण उपकरणांची निर्मिती
आमच्या देशात संरक्षण उपकरणे विदेशातूनच आणली जाऊ शकतात अशाप्रकारची मानसिकता वरचढ ठरली होती. स्वदेशी निर्मात्यांवर आम्ही फारसा विश्वास ठेवत नव्हतो. आमच्या सरकारने ही मानसिकता बदलण्यास यश मिळविले आहे. आमच्या सैन्याने 300 हून अधिक उपकरणे अन् शस्त्रास्त्रांची यादी तयार केली असून त्यांची निर्मिती भारतातच केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले.
खेळणी उद्योगाचा कायापालट
दशकांपर्यंत भारतीय मुले विदेशातून आयात केलेल्या खेळण्यांचा वापर करत होते. या खेळण्यांची गुणवत्ता चांगली नव्हती तसेच ती भारतीय मुलांकरता निर्माण करण्यात आलेली नव्हती. आम्ही आयात होणाऱया खेळण्यांसाठी गुणवत्ता निकष निश्चित केले आणि स्वदेशी उद्योगाला चालना देण्यास सुरुवात केली. 3-4 वर्षांमध्येच खेळणी उद्योगाचा कायापालट झाला असून रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्याचे विधान मोदींनी केले आहे.