आयपीओसाठी अर्ज केलाय... असा तपशील तपासा
आयपीओ 17 मे रोजी होणार बाजारात नोंदणीकृत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील खूप दिवसांपासूनची असणारी प्रतीक्षा अखेर एलआयसीच्या आयपीओने समाप्त केली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांकडून खूप मजबूत प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आयपीओला जवळपास 2.95 पट सबस्क्राईबर्स मिळाले आहेत. मात्र यामध्ये जर आपल्या सारख्या कोणत्याही गुंतवणूकदाराने अर्ज केला असल्यास त्यांना आपल्या आयपीओचा तपशील तपासण्याची संधी मिळणार आहे. याकरीता 12 मे पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच बीएसईवर हा तपशील बघण्याची संधी मिळणार आहे.
12 ते 13 मे पर्यंत समभागांना अलॉटमेंट
एलआयसी आयपीओ 9 मे पर्यंत खुला राहिला होता. मात्र आता आयपीओ बंद झाल्यानंतर समभागांची अलॉटमेंट 12 मे रोजी होणार आहे. यानंतर 17 मे रोजी एलआयसी आयपीओचे समभाग लिस्ट होणार आहेत.
समभाग मिळाले की नाही असे तपासा ः
w सर्वात प्रथम बीएसईच्या कार्यालयीन www.bseindia.com या वेबसाईटवर भेट द्या
w या ठिकाणी पेजवर आपले ‘equity’ चा पर्याय मिळणार आहे
w यावर सिलेक्शन करुन ड्रॉपडाऊनमध्ये ‘एलआयसी आयपीओ’ साखळी करावी
w सदरचे पान उघडल्यावर यामध्ये ऍप्लिकेशन नंबर व पॅन कार्ड नंबर भरावा
w यानंतर गुंतवणूकदारांना 'I am not a robot' चा व्हेरिफाय करत सर्च करावे.
w सर्च पेल्यानंतर एलआयसी आयपीओ शेअर अलॉटमेंटचा स्टेट्स खुला होईल व आपल्याला शेअर अलॉट झाले का नाही हे दिसेल.
एलआयसी आयपीओला मजबूत प्रतिसाद
4 मे रोजी सुरु झालेल्या एलआयसी आयपीओ खरेदी करण्याचा अंतिम दिवस 9 मे रोजी समाप्त झाला असून यामध्ये 2.95 पट आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. यामध्ये 16.2 कोटी समभागांच्या तुलनेत 47.77 कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली आहे. यामध्ये पॉलिसीधारकांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या भागात 6.10 पट तर कर्मचाऱयांसाठी 4.39 पट व रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा 1.99 पट सबस्क्राईब झाला आहे.