अॅपलचा ‘मॅकबुक निओ’लॅपटॉप सादर
सर्वात स्वस्त लॅपटॉप असल्याचा कंपनीचा दावा : किंमत 69,990 रुपये
वृत्तसंस्था/कॅलिफोर्निया
टेक क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध कंपनी अॅपलने त्यांचा सर्वात परवडणारा लॅपटॉप मॅकबुक निओ हा नुकताच सादर केला आहे. ग्राहकांना आता कमी बजेटमध्ये मॅकबुकचा अुनभव घेण्याची संधी कंपनी उपलब्ध करुन देणार आहे. भारतीय बाजारात या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत ही 69,990 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.
आयफोन चिपसेट असलेला लॅपटॉप
ए18 प्रो चिपसेट मॅकबुक निओ मध्ये देण्यात आला आहे. तो 6 कोर सीपीयू आणि 5 कोर जीपीयूसह येणार असल्याची माहिती असून यात 16 कोर न्यूरल इंजिन देखील आहे. एआयच्या मदतीने आता वेगवान कामे करण्याची संधी मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
13-इंच की क्रीन आणि चार रंग
डिझाइनच्या बाबतीत, ते मॅकबुक एअरसारखेच दिसते. यात 13-इंच लिक्विड रेटिना (आयपीएस एलसीडी) डिस्प्ले आहे. ते टिकाऊ अॅल्युमिनियम एन्क्लोजरने बनवले आहे आणि ते चार रंगांमध्ये उपलब्ध असेल - ब्लश, इंडिगो, सिल्व्हर आणि सिट्रस.
बॅटरी लाइफ आणि स्टोरेज पर्याय
अॅपलच्या मते, मॅकबुक निओला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 16 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ मिळतो.त्यात 36.5 डब्लूएच बॅटरी आहे. बॉक्समध्ये समाविष्ट असलेल्या 20 डब्लू युएसबी-सी पॉवर अॅडॉप्टरने ते चार्ज केले जाऊ शकते.
मेमरी : 8जीबी युनिफाइड मेमरी प्रदान केली आहे
स्टोरेज : 256जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्याय
कनेक्टिव्हिटी आणि बाह्य डिस्प्ले सपोर्ट यात युएसबी 3 टाइप-सी पोर्ट आहे
किंमत भारतीय बाजारात
भारतात मॅकबुक निओची सुरुवातीची किंमत 69,990 रुपये आहे. अॅपलच्या वेबसाइटवर यासाठी प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. त्याची विक्री 11 मार्चपासून सुरू होईल. हे नवीनतम मॅकओएसवर काम करेल. यात 1080ज् फेसटाइम एचडी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्पेशियल ऑडिओ सपोर्टसह ड्युअल स्पीकर आहेत.
ठळक नोंदी :
- लॅपटॉप ब्राउझिंग
- व्हिडिओ स्ट्रीमिंग
- फोटो एडिटिंग
- दैनदिंन ऑफिस काम सहजपणे हाताळता येणार