महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अॅपलच्या डब्ल्यूडब्ल्यूडीसीच्या परिषदेत ‘अॅपल इंटेलिजन्स’एआय लाँच

06:14 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वत:चे इमोजी तयार करण्यासह सॅटेलाइटवरुन एसएमएस पाठविता येणार

Advertisement

कॅलिफोर्निया : टेक कंपनी अॅपलचा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम, वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स ‘डब्ल्यूडब्ल्यूडीसी2024’ नुकताच सुरु झाला. क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया, युएस येथे 14 जूनपर्यंत सुरु असणाऱ्या या कार्यक्रमात यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Advertisement

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर, त्यांनी त्यांच्या आयओएस18, वॉचओएस11, टीव्हीओएस18, आयपॅडओएस18 आणि मॅकओएस सेक्युया या उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले आणि त्यांचे तपशील सादर केले.

कंपनीने आपले ‘अॅपल इंटेलिजेन्स’ नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल सादर केले. जे आयफोन, आयपॅड आणि मॅकवरील सर्व अॅप्समध्ये चालेल. त्याचवेळी, व्हॉइस असिस्टंट फीचरसह, चॅट जीपीटी वापरण्याची क्षमता उपकरणांची असणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्वत: इमोजी तयार करता येणार

जेनमोजी, अॅपल इंटेलिजन्ससह येतो. या एआय अॅपद्वारे, वापरकर्ते आता अॅपलच्या उपकरणांमध्ये स्वत:चे इमोजी तयार करू शकतील. इमेज प्लेग्राउंड नावाचा एक नवीन अनुभव देखील उपलब्ध असेल, जो वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रतिमा तयार करण्यात मदत करेल.

ऑन-क्रीन जागरूकता मिळते

सिरीला ऑनक्रीन जागरूकता मिळेल. म्हणजे वापरकर्त्याच्या क्रीनवर काय चालले आहे ते समजू शकेल आणि वापरकर्त्याच्या आदेशावर आधारित अॅपवर कारवाई देखील करेल.

डेटा संग्रहित राहणार नाही

अॅपल म्हणते की, काही शक्तिशाली एआय वैशिष्ट्यांना सामर्थ्य देण्यासाठी आयफोन फक्त आवश्यक डेटा पाठवेल. कंपनीचा दावा आहे की अॅपलद्वारे कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा कधीही संग्रहित केला जाणार नाही.

अॅपल इंटेलिजन्सची मदत

अॅपल इंटेलिजन्स वापरकर्त्यांना दैनंदिन कार्ये पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी आयफोनला भाषा आणि प्रतिमा समजण्यास मदत

करेल. अॅपल इंटेलिजन्स देखील वापरकर्त्याच्या सर्व अॅप्सवर उपलब्ध डेटा पाहून त्याचा वैयक्तिक संदर्भ समजून घेण्यास सक्षम असेल. अॅपलचे म्हणणे आहे की ही शक्तिशाली बुद्धिमत्ता पॉवर प्रायव्हसीसोबत काम करते.

सफारीमध्ये एक नवीन हायलाइट्स टॅब प्रदान करण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना अनेक वेबसाइट्सना भेट न देता शोधण्यात मदत करेल. याशिवाय, वापरकर्त्यांच्या वेब पृष्ठावरील मजकूराचे त्वरित विहंगावलोकन करण्यासाठी एक नवीन सारांश पर्याय प्रदान करण्यात आला आहे. वाचन आणि चित्रपट पाहण्याचा अनुभव सुधारण्यासाठी अॅपल नवीन रीडर आणि ह्यूअर मोड देखील सादर करत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article