For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅपल आयफोन 18 सिरीज सादर करणार नाही

06:02 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅपल आयफोन 18 सिरीज सादर करणार नाही
Advertisement

निक्केई एशियाचा अहवाल : प्रीमियम मॉडेल विक्रीवर लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

टेक कंपनी अॅपल दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपल्या नव्या आयफोन सिरीज अंतर्गत चार मॉडेल्सचे सादरीकरण करत असते. मात्र यावेळी कंपनी आपल्या धोरणामध्ये बदल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. जपानमधील माध्यम कंपनी निक्केई एशिया यांच्या एका अहवालानुसार अॅपल 2026 मध्ये आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये आयफोन 18 चा बेस मॉडेल लॉन्च करणार नसल्याचे समजते.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार अॅपल कंपनीने या मॉडेलचे लॉन्च करण्याचे प्रयोजन 2027 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत टाळलेले आहे. हा निर्णय अॅपल या कंपनीने मेमरी चिप व इतर साहित्याच्या वाढत्या किंमतीच्या कारणास्तव घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीचा सध्याचा फोकस हा प्रीमियम मॉडेलच्या विक्रीवर राहणार असून यामधूनच अतिरिक्त महसूल  कमवण्याचा इरादा कंपनीचा आहे. कंपनी यावर्षी आयफोन 18 सादर करण्याच्या मूडमध्ये नाही आहे.

फोल्डेबल आयफोन निर्मिती

येणाऱ्या काळात कंपनी फोल्डेबल आयफोन सादरीकरणावरती जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. फोल्डेबल आयफोन तयार करण्याची जटिल प्रक्रिया पाहता त्यासाठी नवे साहित्य लागणार आहे. अॅपलने याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यायचे ठरवले असून त्यामध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी जाणवणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.