For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अॅपलने इलेक्ट्रिक कार प्रकल्प केला बंद

06:05 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅपलने इलेक्ट्रिक कार प्रकल्प केला बंद

अॅपल टेस्लासोबत करणार होती स्पर्धा : शेकडो कर्मचारी प्रभावीत

Advertisement

नवी दिल्ली :

आयफोन निर्माता कंपनी अॅपलने आपल्या इलेक्ट्रिक कार प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. कंपनीने हा कार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

टेस्लाला टक्कर देण्यासाठी कंपनी येत्या काही वर्षांत आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन आणणार होती. मात्र आता कंपनीने आपला कार उत्पादन प्रकल्प बंद केला आहे. 27 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ विल्यम्स आणि उपाध्यक्ष केविन लिंच यांनी प्रकल्प बंदबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे काय होणार असा प्रश्न पडला आहे.

Advertisement

कर्मचाऱ्यांमध्ये भीती

अॅपलने आपला इलेक्ट्रिक वाहन कार प्रकल्प कायमस्वरूपी होल्डवर ठेवला आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर कामावरून कमी होण्याची भीती निर्माण झाली असून, प्रकल्पातील सर्व कामे ठप्प झाली आहेत.

टेकक्रंचच्या अहवालानुसार, कंपनी शक्यतो ‘टीममधील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे आणि प्रकल्पावरील सर्व काम थांबवले आहे.’ काही कर्मचाऱ्यांना अॅपलच्या जनरेटिव्ह एआय प्रकल्पांमध्ये स्थानांतरीत केले जाणार असल्याचेही संबंधीतांकडून सांगण्यात येत आहे. अॅपल कार प्रकल्पात अंदाजे 1,400 कर्मचारी होते.

अॅपल कार कधी लाँच होणार होती?

डिसेंबर 2023 मध्ये, कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार, ज्याला अॅपल कार नाव दिले आहे, लाँच करणे 2026 पर्यंत पुढे ढकलले होते. या कारची किंमत एक लाख डॉलर्सपेक्षा कमी असेल अशी अपेक्षा होती. आयफोन निर्मात्याचा हेतू प्रथम कारला स्टीयरिंग व्हील किंवा पॅडलशिवाय  बनवण्याचा होता, ज्यामुळे प्रवाशांना लिमोझिन-शैलीतील वाहनात एकमेकांसमोर बसता येईल. आधीच्या अहवालांनुसार, प्रकल्पाची व्याप्ती नंतर कमी करण्यात आली आणि ड्रायव्हरची सीट, स्टीयरिंग व्हील आणि पेडल्ससह अधिक पारंपारिक डिझाइन तयार केले गेले.

Advertisement
Tags :
×

.