डिझेल, हिरे निर्यातीत ‘अॅपल’ने टाकले मागे
अॅपल आयफोन भारतासह जगभरात लोकप्रिय : अंदाजे 23 अब्ज डॉलर्स किमतींचे आयफोन निर्यात
नवी दिल्ली :
अॅपल आयफोन भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. 2025 मध्ये, अॅपल आयफोन भारतातील सर्वात मौल्यवान निर्यात वस्तू बनल्या आहेत. खरं तर, 2025 मध्ये भारतातून अंदाजे 23 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन पाठवण्यात आले होते, ज्यापैकी सर्वात मोठी निर्यात अमेरिकेत झाली होती. स्मार्टफोन भारतातील सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय स्मार्टफोन निर्यात
2025 मध्ये, जानेवारी ते डिसेंबर दरम्यान, एकूण स्मार्टफोन निर्यात 30.13 अब्ज दशलक्ष डॉलर्सची झाली होती. यात 30.13 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीपैकी एकट्या अॅपल आयफोनचा वाटा 76 टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या एचएस कोड-आधारित डेटानुसार, ऑटोमोटिव्ह डिझेल इंधन आयफोननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, 16.34 अब्ज डॉलर्ससह हिरे, किरकोळ औषधनिर्माण आणि मोटर पेट्रोल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अॅपल निर्यात का वाढतेय
तज्ञांच्या मते, भारतात अॅपलच्या यशामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे स्मार्टफोनसाठी सुरू केलेली उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना. केवळ चिनी कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी, अॅपलने भारतीय कंपन्यांना, विशेषत: टाटा समूहाला, त्यांच्या पुरवठा साखळीत समाविष्ट केले आहे. दुसरे कारण म्हणजे अमेरिकेने चीनमधून इलेक्ट्रॉनिक्सवर लादलेला फेंटानिल टॅरिफ, ज्याचा भारताला फायदा झाला आहे. भारतातून स्मार्टफोनवर फेंटानिल टॅरिफ नसल्याने, जानेवारी 2025 पासून अॅपलने भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात वेगाने वाढवली आहे.
भारतात अॅपलचे नेटवर्क
अॅपल हा पीएलआय योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्याच्या पुरवठादारांना 5वर्षांपासून प्रोत्साहन मिळाले आहे. सध्या भारतात पाच आयफोन कारखाने कार्यरत आहेत. यापैकी तीन कारखाने टाटा समूह आणि दोन फॉक्सकॉन चालवतात. अॅपलच्या पुरवठा साखळीत अंदाजे 45 कंपन्या समाविष्ट आहेत, ज्यात मोठ्या संख्येने एमएसएमई आहेत, ज्या देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी घटक तयार करतात.