अॅपलचा मॅकबुक एअर लॅपटॉप लाँच
किंमत 99,900 रुपयांपासून : 12 एमपी कॅमेऱ्यासह अत्याधुनिक फिचर्स
मुंबई : टेक क्षेत्रातील जगातील दिग्गज कंपनी अॅपल यांनी भारतात एम 4 चिपसह एक नवीन लॅपटॉप मॅकबुक एअर सादर केला आहे. 13 ते 15 इंच डिस्प्लेच्या दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. स्कायब्लू रंगांसह उपलब्ध होणार आहे. लॅपटॉपमध्ये नवीन 12 मेगापिक्सल सेंटर स्टेज कॅमेरा आणि अॅपल इंजेलिजन्सला सपोर्ट करणार आहे. सदरच्या लॅपटॉपच्या विशेष बाबी म्हणजे कंपनीने त्यांची किंमत ही मागील एम3 मॉडेलपेक्षा 15000 रुपयांनी कमी केली आहे. यासह नव्या मॅकबुकची सुरुवातीची किंमत ही 99,900 रुपये आहे. हा लॅपटॉप 12 मार्चपासून अधिकृत वेबसाईट आणि स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
डिस्प्ले : नवीन मॅकबुकच्या 13-इंच मॉडेलमध्ये 2560×1664 पिक्सेल रिझोल्यूशनसह 13.6-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. त्याच वेळी, 15-इंच मॉडेलमध्ये 2880×1864 पिक्सेल रिझोल्यूशनसह 15.3-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. हा ट्रू टोन डिस्प्ले 1 अब्ज रंगांना सपोर्ट करतो. त्याची पीक ब्राइटनेस 500 निट्स आहे.
कामगिरी : लॅपटॉपमधील कामगिरीसाठी, कंपनी 10-कोर सीपीयूसह 8 आणि 10 कोर जीपीयूचा पर्याय देत आहे. हे मॅकओएस सेक्वोइया सॉफ्टवेअरवर काम करते.
रॅम आणि स्टोरेज : नवीन लॅपटॉप 2बी पर्यंत स्टोरेज पर्यायांसह येतात. 13-इंच मॉडेलमध्ये 16 जीबी आणि 24 जीबी रॅम पर्याय उपलब्ध आहेत.