For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅपल आयफोन 17 सप्टेंबरला लॉन्च होण्याची शक्यता

06:39 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अॅपल आयफोन 17 सप्टेंबरला लॉन्च होण्याची शक्यता
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आयफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅप्पल यांचा नवा आयफोन 17 हा स्मार्टफोन सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरचा आयफोन 17 हा चार प्रकारांमध्ये येणार आहे.  आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 एअर व आयफोन 17 प्रो मॅक्स या 4 प्रकारांमध्ये फोन येणार असून स्मार्टफोनचे डिझाईन नव्या प्रकारचे आहे. यामध्ये कॅमेरा हा वरच्या बाजूला देण्यात आलेला आहे. तसेच या कॅमेऱ्याचा लुकही एकदम नवा पाहायला मिळतो आहे.

उत्तम कॅमेरा

Advertisement

आयफोन 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्समध्ये असणाऱ्या कॅमेरा रिंग सेटअपसारखेच या फोनचे कॅमेऱ्याचे सेटअप असणार आहे. 48 मेगापिक्सलचे तीन कॅमेरा यामध्ये देण्यात आले आहेत. दूर अंतरावरचे फोटो अधिक चांगल्या पद्धतीने घेता येण्याची सोय यामध्ये असेल. अॅपल कंपनीने या वेळेला वेपर चेंबर नावाची कुलिंग प्रणाली आणण्याचे निश्चित केले आहे. या प्रणालीमुळे सदरचा आयफोन हा कमी तापू शकणार आहे. उष्णता कमी करण्यासाठी ग्रॅफाईट शीटचा वापर केला जाणार आहे.

किंमती पाहुया

सदरच्या चारही फोनची सुरुवातीची किंमत ही 80 हजाराच्या आसपास असणार आहे. आयफोन 17 ची किंमत 80 हजार रुपये, आयफोन 17 एअरची किंमत साधारण 90000 रुपये, आयफोन 17 प्रोची किंमत 1 लाख 39 हजार 900 रुपये असण्याची शक्यता सांगितली जात आहे. तर प्रो मॅक्सची किमत 1 लाख 64 हजार रुपयांच्या घरात असणार असल्याची माहिती आहे. निर्मिती खर्चामध्ये झालेली वाढ आणि सुट्या घटकांच्या महागड्या दरामुळे यावेळेला आयफोनच्या किमती वाढवण्यात आल्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.