For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मधु मंगेश कर्णिकांच्या वाढदिवसानिमित्त होणार पुस्तके तूला कार्यक्रम

05:35 PM Apr 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मधु मंगेश कर्णिकांच्या वाढदिवसानिमित्त होणार पुस्तके तूला कार्यक्रम
Advertisement

साहित्यिकांनी पुस्तके पाठविण्याचे कोमसापचे आवाहन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचा मुंबई शाखेच्या वतीने येत्या 25 एप्रिलला 95 वा वाढदिवस तसेच अभिजात मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कोमसापचा स्वप्न स्फूर्ती सोहळा होणार आहे. या सोहळ्यात मधुभाईंची पुस्तके तुला कार्यक्रम होणार आहे. 65 किलो पुस्तके तुला मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. रत्नागिरी मालगुंड येथील केशवसुत स्मारक येथे पुस्तकांचे दालन सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कोकणातील साहित्यिकांचा एकत्रित पुस्तक संच उपलब्ध होणारे ठिकाण ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साहित्यिकांची पुस्तके , ग्रंथ ज्यांच्याकडे उपलब्ध असतील त्यांनी एका पुस्तकाच्या दोन प्रती येत्या 20 एप्रिल पर्यंत खालील पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे .

Advertisement

जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, मुक्काम पोस्ट गुढीपुर पिंगुळी ता- कुडाळ 9890107352 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील तालुका निहाय कोकण मराठी साहित्य परिषदच्या शाखा आहेत . त्या शाखांकडेही पुस्तके पाठवू शकता. सावंतवाडी तालुकाध्यक्षॲड संतोष सावंत, मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर ,कुडाळ तालुकाध्यक्ष सौ वृंदा कांबळी ,कणकवली तालुकाध्यक्ष माधव कदम यांच्याकडे जमा करावीत.असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव विठ्ठल कदम यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.