For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घराणेशाही आणि दहशतवादाला गाडून धगधगत्या विचारांची मशाल पेटवा

03:18 PM Nov 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
घराणेशाही आणि दहशतवादाला गाडून धगधगत्या विचारांची मशाल पेटवा
Advertisement

खा. नारायण राणेंच्या जुन्या सहकाऱ्यांचे मतदारांना आवाहन

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी 

घराणेशाही आणि दहशतवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने गाडून टाकून धगधगत्या विचारांची ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल पेटवावी असे कळकळीचे आवाहन नारायण राणे यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत केली. राणेंसाठी चुकून आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही जनतेची माफी मागतो .परंतु , आता जनतेने जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दहशतवाद आणि घराणेशाही मुक्त जिल्हा बनवण्यासाठी सद्सद्विवेक बुद्धीने 20 नोव्हेंबरला मतदान करून महाविकास आघाडीच्या अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन तेली यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना नेते गौरीशंकर खोत, माजी आमदार परशुराम उपरकर ,उमेदवार राजन तेली , माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर , माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत ,माजी जिल्हाप्रमुख संजय पडते ,माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने यापूर्वी दहशतवाद अनुभवला आहे. आता हा एका पिढीकडे मर्यादित होता. परंतु तो आता दुसऱ्या पिढीकडूनही सुरू झाला आहे. त्यामुळे भविष्यातही जिल्ह्यातील जनतेला दहशतवादाच्या छायेखाली जीवन जगावे लागणार आहे. असे जीवन किती दिवस म्हणून जिल्ह्यातील जनता जगणार आहे आता दहशतवादाच्या बरोबर घराणेशाही सुरू झाली आहे .त्याला एकेकाळी दहशतवाद आणि घराणेशाहीच्या विरुद्ध बोलणारे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शालेय शिक्षण मंत्री हे साथ देत आहेत. अभद्र विचारांशी केसरकर यांनी युती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना त्यांनी मोठ्या संकटात टाकले आहे .याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने विचार करून विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही उमेदवारांना घरी बसवावे असे आवाहनही या नेत्यांनी केले. आतापर्यंत कुणी पक्ष सोडला की त्याच्यावर टीका करायची ही राणे यांची वृत्ती झाली आहे .मात्र आपण आणि त्यांच्या मुलांनी पक्ष सोडला की तो भल्यासाठी सोडला असे राणे सांगतात. यावरून त्यांचा स्वार्थ दिसून येत आहे असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले .विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने सदसदबुद्धीने विचार करून महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तीनही उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन केले यावेळी राजन तेली यांनी केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात मतदारांची कशी फसवणूक केली याचा पाढाच वाचला .केसरकर आपल्या स्वार्थासाठी जनतेची फसवणूक करत आहेत .आता जनतेत त्यांच्या बाबत प्रचंड रोष आहे .त्यामुळे या निवडणुकीत केसरकर यांचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले

Advertisement

केसरकर यांनी राणे यांच्या मुलाला जेलमध्ये टाकले होते .तेच राणे आता मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत मुलाला जेलमध्ये जाण्यापासून राणे रोखू शकले नाही ते आम्हाला काय जेलमध्ये टाकणार असा सवालही या नेत्यांनी केला.

Advertisement
Tags :

.