For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक बांधिलकीची रुग्णवाहिका लवकरच ऑन ड्युटी २४ तास

03:30 PM Mar 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सामाजिक बांधिलकीची रुग्णवाहिका लवकरच ऑन ड्युटी २४ तास
Advertisement

रुग्णवाहिकेसाठी आर्थिक मदतीचे दात्यांना आवाहन ; सैनिक पतसंस्थेकडून १० हजाराची मदत

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी नोंदणीकृत संस्थेकडून गेली सात वर्ष रुग्णांना तत्काळ सेवा दिली जाते. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची 24 तास दखल घेतली जाते. परंतु काही वेळा गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी गोवा -बांबुळी किंवा जिल्हा रुग्णालय ओरोसला हलवायचे झाल्यास 108 रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा फटका बसतो .त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने अल्प दरात रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असल्याचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी सांगितले.दरम्यान , रुग्णवाहिकेसाठी सामाजिक बांधिलकीने केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला सैनिक पतसंस्था सावंतवाडी शाखेकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी पुढाकार घेऊन दहा हजाराची मदत सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे. यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री बाबुराव कविटकर, व्हा चेअरमन चंद्रकांत शिरसाठ, उपकार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल बिडवे, संचालक भिवा गावडे आदी उपस्थित होते.या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी इच्छुक दात्यांनी आर्थिक मदतीसाठी वरील क्यूआर कोडचा वापर करून संबंधित नंबरवर स्क्रीन शॉट पाठवावा. त्यानंतर संस्थेकडून रितसर पावती दिली जाईल. या सेवाभावी उपक्रमात पुढाकार घ्यावा असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले आहे.
CBS/C 22407000000744
IFC CODE SIDC0001022
MICR CODE 416801352
संपर्क- रवी जाधव 9405264027
रूपा मुद्राळे- 9422633971
लक्ष्मण कदम -9423304674

Advertisement

Advertisement
Tags :

.