महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कणकवली विधानसभेवर विजयाचा भगवा फडकवा !

03:15 PM Oct 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आवाहन

Advertisement

देवगड- वार्ताहर
विधानसभा निवडणूकीत आपल्याला एकजुटीने काम करायचे असून 'मशाल' हे चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवा. कणकवली विधानसभेवर महाविकास आघाडीच्या विजयाचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे केले.

Advertisement

कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यात उबाठा शिवसेना पक्षाच्यावतीने जि. प. मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू आहेत. तालुक्यातील मिठबाव, किंजवडे, कुणकेश्वर जि. प. मतदारसंघात नुकत्याच घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, विभागप्रमुख संतोष दळवी, तेजस राणे, संदीप गावकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, विभागप्रमुख विकास कोयंडे, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, नगरसेवक तेजस मामघाडी, नितीन बांदेकर, निकिता जोशी, उदय करगुंटकर, मुन्ना महाडिक, रुपेश नवलू, गणेश कावले, महेंद्र भुजबळ, अमित पेडणेकर, गणेश राऊत, प्रवीण कावले, आशिष पराडकर, धनंजय जोशी आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी देवगड बुथ क्र. ६६ च्या शाखाप्रमुखपदी स्वप्नील महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# news update # konkan update # news update
Next Article