सावंतवाडी टर्मिनससाठी परिवहन मंत्र्यांकडे नोंदवा ऑनलाईन तक्रार
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आवाहन
न्हावेली /वार्ताहर
सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार मागणी नोंदवण्याबद्दल आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.कोकणवासीयांना www.pratapsmaik.com या वेबसाईटवर जाऊन Grievances ( तक्रार) सेक्शनमध्ये खालील प्रमुख मागणीसह नोंदणी करण्यात यावी.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचे काम तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावे,जेणेकरून प्रकल्प मार्गी लागेल व प्रवाशांना सुविधा मिळतील.जास्तीत जास्त लोकांनी मागणी नोंदवावी,जेणेकरून हा विषय मंत्रालयात अग्रक्रमाने घेतला जाईल.सावंतवाडी टर्मिनसचे काम त्वरित सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी नोंदवावी यात वेबसाईट www.pratapsamaik.com Grievances ( तक्रार) सेक्शन Public Transport ( सार्वजनिक वाहतूक) निवडा Describe your issue मध्ये पेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसमुळे कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.निधी परत जाणे आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प ठप्प आहे.हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी व प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तो तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावा.मागणी नोंदवल्यानंतर येणाऱ्या पोचपावतीला स्क्रीनशॉट संबधित ग्रुपवर अपलोड करा.या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती देण्यासाठी आपली मागणी नोंदवू शकता आणि हा संदेश इतर कोकणवासीयांपर्यत पोहोचवावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.