For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपना दल नेत्याची उत्तर प्रदेशात हत्या

06:11 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपना दल नेत्याची उत्तर प्रदेशात हत्या
Advertisement

प्रयागराजमध्ये वैयक्तिक वैमनस्यातून घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ प्रयागराज

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील आणि ‘अपना दल-एसके’चे नेते इंद्रजित पटेल यांची रविवारी प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असून गंगापार युनिटच्या लॉ सेलचे कार्यकारी सदस्य होते. याशिवाय ते पेशाने वकीलही होते.

Advertisement

प्रयागराजच्या सोरावन भागात अपना दल-एसके नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून इंद्रजित पटेल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सर्वेश पटेल नामक त्यांच्या शेजाऱ्याने वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सर्वेश पटेलला अटक केली आहे. आरोपी सर्वेश पटेल याच्याकडून दोन पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत.

ग्रामस्थांमध्ये संताप

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्याकांडानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इंद्रजित पटेल आणि आरोपी सर्वेश पटेल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. वैयक्तिक वैमनस्यातून सर्वेशने इंद्रजित पटेल यांची हत्या केली आहे. मात्र, दोघांमधील वादाचे खरे कारण काय आणि वाद कशामुळे झाला, याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement
Tags :

.