महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘अफ्रेड’चा ट्रेलर प्रदर्शित

06:22 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोनीचा सायन्स फिक्शन हॉरर चित्रपट ‘अफ्रेडमध्ये जॉन चो आणि कॅथरीन वॉटरस्टोन दिसून येणार आहेत. हा चित्रपट डिजिटल पॅमिली असिस्टंटविषयी असून जो जीवघेणा होतो. डिजिटल फॅमिली असिस्टंटला एआयए म्हटले जाते. स्मार्ट होमला पुढील स्तरावर नेत एकदा युनिट आणि त्याचे सर्व सेंसर आणि कॅमेरे संबंधिताच्या घरात इन्स्टॉल होतात, तेव्हा एआयए हे सर्व करण्यास सक्षम होते. जॉन चो आणि कॅथरीन वॉटरस्टोन चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

Advertisement

एआयए परिवाराच्या वर्तनाला जाणून त्यानुसार अनुमान लावणे सुरू करत असल्याचे यात दाखविले जाणार आहे. ब्लमहाउसकडून निर्मित हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर सादर करण्यात आला असून याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली.

Advertisement

ट्रेलरमध्ये कर्टिस आणि त्याचे कुटुंब नव्या एआय असिस्टंटला नेव्हिगेट करताना दिसून येते. प्रारंभी हा एआय असिस्टंट प्रत्येक काम लवकर आणि अधिक करतो. फूड ऑर्डर करण्यापासून मुलांना गोष्टी ऐकविण्यापर्यंत घराच्या प्रत्येक कामात मदत करतो. सर्व बिलांची देखील तोच काळजी घेतो. परंतु नंतर कामात गडबड होऊ लागते आणि एआय असिस्टंट जीवघेणा ठरतो. अफ्रेड चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस वीट्ज यांनी केले आहे. वीट्ज, जेसन ब्लम आणि एंड्य्रू मियानो यांनी याची निर्मिती केली आहे. चित्रपटात हवाना रोज लियू, लुकिता मॅक्सवेल, डेव्हिड डस्टमलचियन आणि किथ कॅराडाइन हे कलाकारही दिसून येतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article