तमिळ चित्रपटसृष्टीत अपारशक्तिचे पदार्पण
चित्रपट ‘रुट-रनिंग आउट ऑफ टाइम’चे चित्रिकरण सध्या चेन्नईत सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूर्यप्रताप एस करत आहे. या चित्रपटात अपारशक्ति खुराना देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात तो तमिळ अभिनेता गौतम कार्तिकसोबत झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे अपारशक्ति हा तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. मी ‘रुट-रनिंग आउट ऑफ टाइम’द्वारे तमिळ चित्रपटसृष्टीतील स्वत:ची सुरुवात करण्यापासून उत्सुक आहे. चित्रपटाची कहाणी अत्यंत आव्हानात्मक आणि वेगळी आहे. या चित्रपटाच्या गुणवत्तापूर्ण टीमसोबत काम करून अत्यंत आनंदी असल्याचे अपारशक्तिने म्हटले आहे.
अपारशक्ति आणि त्याचा बंधू आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील दमदार अभिनेता आहे. दोन्ही भावांचे बाँडिंग कमालीचे आहे. दोन्ही भावांनी एकाचवेळी मुंबईत दाखल होत कारकीर्द घडविण्यास सुरुवात केली होती. अपारशक्ति हा हरियाणा अंडर 19 क्रिकेट टीमचा कर्णधारही राहिला आहे.
अपारशक्ति हा ‘स्त्राr’ चित्रपट आणि ‘जुबली’ सीरिजमुळे चर्चेत आला होता. तसेच तो पुढील काळात वाणी कपूर आणि परेश रावलसोबत ‘बदतमीज दिल’मध्ये दिसून येणार आहे.