For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅक्शन अवतारात दिसणार अपारशक्ति

06:45 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅक्शन अवतारात दिसणार अपारशक्ति
Advertisement

इमरान हाश्मीच्या चित्रपटात खलनायक

Advertisement

अपारशक्ति खुरानाला स्वत:च्या कारकीर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते, आता अपारशक्ति हा इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट ‘गनमास्टर जी9’मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. अलिकडेच सेटवरील त्याची पहिली झलक समोर आली आहे.

अपारशक्तिने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील स्वत:चा लुक शेअर केला आहे. तसेच त्याने जबरदस्त अॅक्शनदृश्यांची अनेक छायाचित्रे आणि क्लिप्स शेअर केल्या आहेत. खलनायकाच्या भूमिकेतील रफ लुकमधील स्वत:ची छायाचित्रेही त्याने दाखविली आहेत.

Advertisement

गनमास्टर जी9 चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने पेले आहे. यापूर्वी त्याने ‘आशिक बनाया आपने’चे दिग्दर्शन पेले होते. आदित्यला ‘क्रॅक’, ‘टेबल नंबर 21’ आणि ‘कमांडो’ फ्रेंचाइजीसाठी ओळखले जाते. गनमास्टर जी9 चित्रपटात इमरान आणि अपारशक्तिसोबत जेनेलिया डिसूजा आणि अभिषेक सिंह देखील आहे.

Advertisement
Tags :

.