For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपर्णा विनोद झाली विभक्त

06:17 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अपर्णा विनोद झाली विभक्त
Advertisement

विवाहाच्या दोन वर्षांनीच घटस्फोट

Advertisement

दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा विनोदने रिनिलराज पीके या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर याची घोषणा केली असून स्वत:च्या विवाहाला एक वाईट काळ ठरविले आहे. वैवाहिक जीवन माझ्यासाठी भावनिक थकवा आणणारा अनुभव होता असे अभिनेत्रीने म्हटले आहे. अपर्णाने आसिफ अली आणि इंद्रजीत सुकुमारन यांची मुख्य भूमिका असलेला मल्याळी चित्रपट ‘कोहिनूर (2015)’ आणि थलपति विजयच्या ‘बैरवा’ चित्रपटात काम केले होते.

अलिकडेच्या माझ्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडला आहे. अत्यंत विचारपूर्वकपणे मी वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. परंतु आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि घाव भरण्यासाठी हा योग्य निर्णय असल्याचे माझे मानणे असे अपर्णाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. माझा विवाह माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड आणि भावनिक थकवा आणणारा काळ होता. याचमुळे मी पुढे जाण्यासाठी तो अध्याय बंद केला आहे. मी या काळात मिळालेले प्रेम आणि समर्थनासाठी आभारी आहे. अधिक सकारात्मक स्वीकारण्यासाठी मी तयार असल्याचे तिने म्हटले आहे. अपर्णा आणि रिनिलराज पीकेने फेब्रुवारी 2023 मध्ये विवाह केला होता. अपर्णाने कोडकारा येथील कॉलेजमधून मानसशास्त्राची पदवी मिळविली आहे.  दिग्दर्शक प्रियनंदनन यांचा चित्रपट ‘नजन निन्नोडु कूडेयुंडू’द्वारे कारकीर्दीला सुरुवात केल्यावर अपर्णाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापूर्वी ती नादुवन या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसून आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.