अपर्णा भैरवकर मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागात मुंबई विद्यापीठात प्रथम
02:52 PM Jun 25, 2026 IST | तरुण भारत सिंधुदुर्ग
Advertisement
ओटवणे गावची कन्या तर एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाचा अंतिम वर्ष (सत्र-८) २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असुन ओटवणे गावची कन्या कु अपर्णा शंभा भैरवकर हिने ९.५५ सीजीपीए मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु अपर्णा भैरवकर ही कणकवली येथील एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. कु अपर्णा भैरवकर ही ओटवणे येथील मंगलमूर्ती फॅब्रिकेशनचे मालक शंभा उर्फ आनंद भैरवकर यांची ती कन्या तर सामाजिक कार्यकर्ते संतोष भैरवकर आणि बँक ऑफ बडोदा सावंतवाडी शाखेच्या उपव्यवस्थापक सौ. प्रतिमा भैरवकर यांची यांची पुतणी आहे. कु अपर्णा भैरवकर हिच्या या उज्वल यशाबद्दल तिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Advertisement
Advertisement