For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकारणात काहीही होऊ शकते; महाडिक-सतेज पाटील गट एकत्र येणार? शौमिका महाडिक यांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

09:49 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजकारणात काहीही होऊ शकते  महाडिक सतेज पाटील गट एकत्र येणार  शौमिका महाडिक यांच्या सूचक वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
Advertisement

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे गट एकत्र येणार का, याबाबत राजकीय चर्चाना उधाण आले असताना, कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते," असे सूचक वक्तव्य गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी केले. गोकुळसाठी त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गोकुळ आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडत आम्ही एकत्र येण्यासाठी आणि संघर्षासाठीही तयार आहोत. संबंधितांचा पुढील निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महाडिक आणि सतेज पाटील गटांमधील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Advertisement

गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार आहोत. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर सर्वजण एकत्रितपणे दिसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून, जागावाटपाच्या प्रक्रियेनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. गोकुळच्या निवडणुकीसाठी त्यानी उमेदवारी अर्ज दाखल केला. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्याप चर्चेत आहे. जनसुराज्य पक्षाकडून चार जागांची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीच्या चर्चेनंतर होणार असल्याचे आमदार माने यांनी सांगितले.

गोकुळमध्ये चार जागांची मागणी; जनसुराज्य महायुतीसोबतच : आ. अशोकराव माने
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने महायुतीकडे चार जागांची मागणी केली असून, पक्ष महायुतीसोबतच राहणार असल्याचे आमदार अशोकराव माने यांनी स्पष्ट केले, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, गोकुळसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.