कुठल्याही प्रकारचा आवाजाचा होतो त्रास
मुलाला अजब आजार, खाण्याचा आवाजही असह्य
जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहित नसतात. परंतु इंटरनेटच्या युगात जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अजब गोष्टींविषयी माहिती मिळविता येते. याचमुळे अशा अनेक गोष्टी समोर येतात, ज्या अनेकांसाठी नव्या असतात. सर्वसाधारणपणे कुठलाही सण हा परिवारासोबत मिळून साजरा केला जातो. कुठल्याही सणाच्या दिवशी कुणी एकटा बसून खाऊ इच्छिणार नाही. परंतु एका इसमाला असे करावे लागते.
इंग्लंडच्या लीड्स येथे राहणारा ग्रेसन व्हाइटेकर नावाच्या मुलाला अजब आजार आहे. या आजारामुळे तो इतरांसोबत बसून खाण्याचा आनंद अनुभवू शकत नाही. त्याचे आईवडिल एलेक्स आणि डॉन त्याला बालपणापासूनच स्वत:च्या खोलीतच बहुतांश वेळ घालविताना पाहत आहेत, हा प्रकार त्यांना दु:खी करणारा आहे. ग्रेसन यांनी स्वत:च्या आयुष्यात कधीच सणासुदीच्या काळातही परिवारासोबत बसून जेवण केलेले नाही. तो स्वत:च्या खोलीला लॉक करून बसतो, आता तो स्वत:चे घर सोडून वेगळा राहतो. जेणेकरून त्याला परिवाराच्या सदस्यांचा कुठलाही आवाज ऐकायला लागू नये.
ग्रेसनला मिसोफोनिया नावाची मेडिकल कंडिशन आहे. यात माणूस प्रत्येक आवाजावर भावुक होतो. लोक बोलण्यापासून त्यांच्या खाण्यापिण्याचा आवाज संबंधिताला त्रास देऊ लागतो. ग्रेसनला बालपणापासूनच ही समस्या असल्याने त्याने शाळेला जाणेही सोडून दिले. तो कुठल्याही प्रकारचा आवाज सहन करू शकत नाही. सध्या तो पार्टनर बेथसोबत राहतो, बेथ त्याची ही कंडीशन समजू शकते. याचबरोबर ग्रेसन थेरपी घेत असून यामुळे त्याच्या कंडिशनमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे.