For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्वय द्रविडचे अर्धशतक

06:43 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन्वय द्रविडचे अर्धशतक
Advertisement

वृत्तसंस्था, हंबनटोटा (श्रीलंका)

Advertisement

सध्या भारताचा 19 वर्षांखालील युवा क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील सोमवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारत युवा संघातील दमदार फलंदाज अन्वय द्रविडने शानदार अर्धशतक झळकविले. अन्वय हा भारताचा माजी कर्णधार आणि प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा आहे.

सोमवारच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय युवा संघाने 50 षटकांत 285 धावा जमविल्या. अन्वय द्रविडने 67 चेंडूत 87 धावा झळकविल्या. भारतीय युवा संघाची या सामन्यात 19 षटकाअखेर स्थिती 4 बाद 81 अशी होती. अन्वयने आपल्या 87 धावांच्या खेळीमध्ये 1 षटकार आणि 9 चौकार ठोकले आहेत तसेच त्याने अर्जुन रजपूतसमवेत पाचव्या गड्यासाठी 145 धावांची शतकी भागिदारी केली. रजपूतने 81 चेंडूत 76 धावा जमविल्या. लंका युवा संघातर्फे गिमहान मेंडीसने 41 धावांत 5 गडी बाद केले. या मालिकेत भारतीय युवा संघाने यापूर्वी पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.