For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अन्वय द्रविड, आर्यवीर सेहवाग युवा भारतीय संघात

06:22 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन्वय द्रविड  आर्यवीर सेहवाग युवा भारतीय संघात
Advertisement

 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओमान, मस्कत येथे  5 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आगामी एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय 19 वर्षांखालील संघ जाहीर झाला असून त्यात कर्नाटकाच्या अन्वय द्रविड आणि दिल्लीचा आर्यवीर सेहवाग यांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

अन्वय द्रविड आणि आर्यवीर सेहवाग हे भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि वीरेद्र सेहवाग यांचे सुपुत्र आहेत. या दोघांनीही नुकत्याच पार पडलेल्या विनू मंकड ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. 17 वर्षीय अन्वयने या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या 19 वर्षांखालील स्पर्धेत गुजरातविरुद्ध 300 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठताना केवळ 100 चेंडूत आक्रमक 151 धावा केल्या होत्या. याआधी जुलै महिन्यात हंबनटोटा येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या युथ वनडे सामन्यातही अन्वयने 87 चेंडूंत 87 धावांची खेळी करत आपली क्षमता सिद्ध केली होती. 19 वर्षीय आर्यवीरनेही विनू मंकड ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला होता. त्याने विजयनगरम येथे चंदीगडविरुद्ध 143 चेंडूंत 173 धावांची शानदार खेळी केली होती.

लक्ष्य रायचंदानीच्या नेतृत्वाखलील भारतीय संघ गट अ मध्ये असून या गटात त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरात, नेपाळ आणि पाकिस्तान हे संघ आहेत. ‘अ‘ गट आणि ‘ब‘ गट (बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मलेशिया) यांमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, जी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे तर अंतिम सामना शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.

भारत यू-19 संघ - लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (विकेटकीपर), रजत बाघेल (विकेटकीपर), व्ही. यशवीर, आर्यन सावसानी, मोहित उलवा, काव्या पटेल, शविन विनोद, इशान सूद.

भारताचे वेळापत्रक

भारत विरुद्ध नेपाळ 6 नोव्हेंबर,

भारत विरुद्ध पाकिस्तान, 8 नोव्हेंबर

भारत विरुद्ध यूएई 10 नोव्हेंबर.

Advertisement
Tags :

.