अनुष्काला मिळाला मोठा बायोपिक
आता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपटाची तयारी केली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक देव मनोरिया करणार आहे. देव मनोरिया हाच चित्रपटात अहिल्याबाई यांचे पती होळकर यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण प्रयागराज, वाराणसी आणि लखनौ येथे पार पडणार आहे. याची सर्व तयारी आतापासूनच केली जातेय. तर चित्रपटाच्या काही हिस्स्यांचे चित्रिकरण मध्यप्रदेशात करण्यात येणार आहे.
या चित्रपटात दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री दिसून येणार असल्याचे बोलले जातेय. दिग्दर्शकाकडून अनुष्का शेट्टीचे नाव समोर करण्यात आले आहे. मनोरियाने अनुष्काशी यासंबंधी चर्चाही केली आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे 1800 कोटी रुपये असणार आहे. या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप ठरलेली नाहीत. या चित्रपटात अनुष्का शेट्टीची वर्णी लागल्यास तिच्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे. यानिमित्ताने तिला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चाहते निर्माण करता येणार आहेत.