अनुष्का गावकर आणि संतोषी जंगम यांची कोकण विभागीय खो खो संघात निवड
ओटवणे |प्रतिनिधी
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील कु अनुष्का आनंद गावकर आणि कु संतोषी भिवा जंगम या दोन्ही विद्यार्थिनींची कोकण विभागीय खो खो संघात निवड झाली आहे. याबद्दल या दोन्ही विद्यार्थिनींचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. पाली येथे होणाऱ्या मुंबई युनिव्हर्सिटी खो-खो स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थिनी एसपिके कॉलेजमध्ये कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून अनुष्का गावकर ओटवणे गावातील तर संतोषी जंगम सावंतवाडी येथील आहे. यापूर्वीही या दोन्ही विद्यार्थिनींनी तालुका व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा मध्ये यश संपादन केलेले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले, संस्थेच्या चेअरमन शुभदादेवी भोसले, संचालक युवराज लखमसावंत भोसले, संचालक डी टी, देसाई, डॉ सतीश सावंत, प्राचार्य डॉ डी एन भारमल, क्रीडा शिक्षक सीए नाईक, प्राध्यापक एम ए ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.