For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अशोक सिंघलांच्या व्यक्तिरेखेत अनुपम खेर

07:00 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
अशोक सिंघलांच्या व्यक्तिरेखेत अनुपम खेर
Advertisement

अभिनेते अनुपम खेर यांनी ‘श्री रामभूमी’चे चित्रिकरण सुरू करण्यापूर्वी अयोध्येत भगवान रामल्ला यांचे दर्शन घेतले होते. आता अनुपम यांनी चित्रपटाच्या सेटवरून एक खास छायाचित्र शेअर करत यातील साकारत असलेल्या व्यक्तिरेखेवरून खुलासा केला आहे. या छायाचित्रांमध्ये अनुपम खेर हे पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि अंगोछा परिधान केल्याचे दिसून येते. या लुकमध्ये अनुपम यांच्या माथ्यावर पांढऱ्या अन् लाल रंगाचा टिळा आहे तसेच त्यांनी चष्मा घातलेला आहे. हा लुक पाहता अनुपम खेर हे चित्रपटात अशोक सिंघल यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक सिंघल यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाला योग्य दिशा दिली होती, सिंघल हे भगवान रामाचे सच्चे भक्त होत. इतिहासातील अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणे आणि संवेदनशीलतेसह पार पाडणे माझ्यासाठी अत्यंत मोठी जबाबदारी आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी पूर्ण मेहनत करणार असल्याचे खेर यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.