For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोटक बँकेच्या एमडी पदी अनुप कुमार साहा

07:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोटक बँकेच्या एमडी पदी अनुप कुमार साहा
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली 

Advertisement

कोटक महिंद्रा बँकेने गुरुवारी अनुप कुमार साहा यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. साहा हे 1 जानेवारी 2027 पासून हे पद स्वीकारतील. ते सध्या बँकेत कार्यकारी संचालक पदावर आहेत. साहा यांना 32 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांना बँकिंग आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये 25 वर्षांचा अनुभव आहे.

 नियुक्तीमुळे समभाग 4 टक्क्यांनी वधारला

Advertisement

कोटक महिंद्रा बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून अनुप कुमार साहा यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाल्यानंतर बँकेचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले. ते जवळपास 433 वर पोहोचले आहेत. ब्रोकरेज कंपन्यांनी साहा यांच्या नियुक्तीला बँकेसाठी एक सकारात्मक पाऊल म्हटले आहे.

जानेवारी 2026 मध्ये कोटक बँकेत रुजू

अनूप कुमार साहा जानेवारी 2026 मध्ये कोटक महिंद्रा बँकेत रुजू झाले. मार्च 2026 पासून संचालक म्हणून ते बँकेचे संपूर्ण रिटेल बँकिंग, सरकारी व्यवसाय, डेटा अनालिटिक्स आणि मार्केटिंग विभाग सांभाळत होते. एमडी वासवानी म्हणाले, ‘अनुप हे वित्तीय क्षेत्रातील एक अनुभवी नेते असून त्यांना विविध व्यवसाय, ग्राहक आणि कामकाजाचा सखोल अनुभव आहे. कोटकमध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी आमच्या टीमसोबत मिळून काम केले आहे आणि भविष्यातील संधींची उत्तम जाण दाखवली आहे.’

साहा यांच्यासमोर 3 प्रमुख आव्हाने असतील:

ठेवी वाढवणे : लोक आता एफडीऐवजी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये अधिक पैसे गुंतवत आहेत. अशा परिस्थितीत बँकेत नवीन ठेवी जमा करणे हे एक आव्हान असेल.

तारणरहित कर्ज : आरबीआय वैयक्तिक कर्जासारख्या तारणरहित कर्जांबाबत कठोर आहे. साहा यांना बँकेची वाढ आणि सरकारी नियम यांच्यात संतुलन साधावे लागेल.

घटणारे मार्जिन : ठेवींवरील जास्त व्याज आणि व्याजदरातील चढ-उतार बँकेच्या नफ्यावर दबाव आणत आहेत. याचा सामना करणे एक आव्हान असेल.

Advertisement
Tags :

.