अनुप बागची बनले एचडीएफसी बँकेचे नवे एमडी-सीईओ
वृत्तसंस्था, मुंबई
एचडीएफसी बँकेने अनुप बागची यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. बागची 27 ऑक्टोबरपासून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा राहणार आहे. आरबीआयची मंजुरी मिळाल्यानंतर बँकेने 1 ऑक्टोबर रोजी शेअर बाजाराला ही माहिती दिली. सध्याचे एमडी आणि सीईओ शशीधर जगदीशन यांचा कार्यकाळ 26 ऑक्टोबर रोजी संपत आहे. जगदीशन यांनी पुढील कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती मागितली नाही.
अनुप बागची यांना बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ होते. एमडी-सीईओ पदाच्या शर्यतीत कायझद भारू यांचे नावही होते.
अनूप कुमार कोटक बँकेचे एमडी आणि सीईओ
कोटक महिंद्रा बँकेने अनुप कुमार साहा यांची नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. साहा 1 जानेवारी 2027 पासून या पदावर असतील. ते सध्या बँकेत कार्यकारी संचालक पदावर आहेत. साहा यांना 32 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांना बँकिंग आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये 25 वर्षांचा अनुभव आहे.