For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनुजा पाटीलच्या शतकाने पश्चिम विभाग सुस्थितीत

06:45 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनुजा पाटीलच्या शतकाने पश्चिम विभाग सुस्थितीत
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

महिलांच्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत येथे सुरू असलेल्या सामन्यात भारताची माजी अष्टपैलू अनुजा पाटीलने झळकविलेल्या शानदार शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने मध्यविभागावर पहिल्या डावात 111 धावांची भक्कम आघाडी मिळविली.

मध्य विभागाने पहिल्या डावात 245 धावा जमविल्यानंतर पश्चिम विभागाचा पहिला डाव 356 धावांवर आटोपला. अनुजा पाटीलने 120 चेंडूत 122 तर जेमिमा रॉड्रिग्जने 97 चेंडूत 69 धावा जमविल्या. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 155 धावांची भागिदारी केली. शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर मध्य विभागाने दुसऱ्या डावात बिनबाद 68 धावा जमविल्या. सलामीची पुनम राऊत 32 तर परविन 35 धावावर खेळत आहेत. देविका वैद्यने 58 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पश्चिम विभागाची कर्णधार स्मृती मानधनाने 8 व्या क्रमांकावर फलंदाजीत येत 52 चेंडूत 50 धावा झोडपल्या. मध्य विभागातर्फे पुनम राऊतने 116 धावांत 7 गडी बाद केले.

Advertisement

या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात पूर्व विभागाने उत्तर विभागाचा डावाने पराभव केला. या सामन्यातील खेळाच्या दुसऱ्या दिवशी पूर्व विभागाने 18 गडी बाद केले. कर्णधार दिप्ती शर्माने 7 बळी मिळविले. पूर्व विभागाने पहिला डाव 8 बाद 385 धावांवर घोषित केला. त्यानंतर पूर्व विभागाने उत्तर विभागाला पहिल्या डावात 108 धावांत गुंडाळले. त्यानंतर उत्तर विभागाला पूर्व विभागाकडून फॉलोऑन देण्यात आला. उत्तर विभागाने 8 बाद 156 या धावसंख्येवरून डावाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा दुसरा डाव लवकरच आटोपला.

Advertisement
Tags :

.