For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्रदेशचा अनुज तालियान चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

10:11 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्रदेशचा अनुज तालियान चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
Advertisement

श्रेयासी मुखर्जी, संजुराणी विजेते, महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

Advertisement

बेळगाव : गोवा येथे स्पर्धेत इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन आयोजित 13 व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय शररीसौष्ठव स्पर्धेत उत्तरप्रदेशचा मनोल तालियान यांनी आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर फेडरेशन चषक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबाचा मानकरी ठरला. महिलांच्या गटात श्रेयासी सी मुखर्जी (पं. बंगाल), संजुराणी (सेंट्रल रेव्हेन्यू) यांनी विजेतेपद पटकाविले. तर सांगीक गटात महाराष्ट्र संघाने 160 गुणासह वैयक्तीक विजेतेपद, तामिळनाडूने 135 गुणासह पहिले उपविजेतेपद, ओडिसा 105 गुणासह दुसरे उपविजेतेपद पटकाविले. गोवा येथील वॉस्को येथे झालेल्या 13 व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. जवळपास या स्पर्धेत 200 हून अधिक स्पर्धकांनी विविध राज्यातून भाग घेतला होता.

निकाल पुढीलप्रमाणे 

Advertisement

  • 55 किलो : 1)गोपालकृष्ण राधाकृष्णन (तामिळनाडू), 2)दिपेश भोवरा (महाराष्ट्र), 3) मिथेश शेलार (गुजरात), 4) सतेंद्र मिरावी (छत्तीसगड), 5)संदीप तारने (महाराष्ट्र),
  • 60 किलो : 1) जयप्रकाश तंगादुराई (तामिळनाडू), 2)गंगाधरस्वामी एच. एम. (कर्नाटक), 3)झाकीर हुलूर (कर्नाटक), 4)वास्कर मंडल (पं. बंगाल), 5)हमीद खान (जीबीबीए),
  • 65 किलो : 1)अशोक बेहरा (छत्तीसगड), 2)बीपिन निखीलदास (महाराष्ट्र), 3)बिंदूसागर कलाश (ओडीसा), 4)दिनेश गावकर (जीबीबीए), 5)खार्नीरन शाहीजा (मणिपूर),
  • 70 किलो :  1)पंचाक्षरी लोनार (महाराष्ट्र), 2)बादल बेहरा (ओडीसा), 3)दिपक (हरियाना), 4)जावेद मोहिद (जम्मू आणि काश्मिर, 5)शंशाका शाहु (ओडीसा)
  • 75 किलो :  1)अमित बुयांग (ओडीसा), 2)विशाल सावंत (महाराष्ट्र), 3)बिजॉय गोराय (पं.बंगाल), 4)व्हेंगम किरणसिंग (मणिपूर), 5)संदीप (हरियाना),
  • 80 किलो :  1)अरनॉडसिंग कोटीओजान (मणिपूर), 2)संतोष शुक्ला (महाराष्ट्र), 3)पालाश गोलदार (पं. बंगाल), 4)उपांशू जस्वाल (उत्तरप्रदेश), 5)सईफुल्ला शेख (आंध्रप्रदेश),
  • 85 किलो :  1)अमित कुमार (राजस्थान), 2)निघागुम सुरेशचंद्रसिंग (मणिपूर), 3)अजयकुमार (हरियाना), 4)अखिल ए. (केरळ), 5)आशिश लोखंडे (महाराष्ट्र),
  • 90 किलो 1) : देवेंद्र शर्मा (दिल्ली), 2)प्रश्नीत वीरसिंग (उत्तराखंड), 3)एन. पांडीयन (तामिळनाडू), 4)सचिन (सशस्त्र सीमाबल) 5)निरजकुमार सागर (राजस्थान),
  • 90 ते 100 :  किलो 1)विजय भोयार (विदर्भ), 2)सनीदिया भिस्त (उत्तराखंड), 3)विवेक ठाकुर (सशस्त्र सीमाबल), 4)सिध्दार्थसिंग (उत्तरप्रदेश), 5)प्रदीप ठाकुर (मध्यप्रदेश),
  • 100 वरील किलो गट :  1)अनुज तालियान (उत्तरप्रदेश), 2)सुखदिप सिंग (पंजाब), 3)मनोज अग्नीहोत्री (उत्तरप्रदेश), 4)बसंतसिंग (पंजाब), 5)नितीन बाहु (केरळ).

मेन्स स्पोर्ट्स फिजिक्स : 165 सेंटीमीटर वरील

1)संदीपसिंग (दिल्ली), 2)विघ्नेश वरन (तामिळनाडू), 3)मोहितकुमार (उत्तरप्रदेश), 4)नारायण भिशोही (ओडीसा), 5)सागर मयुऱ्या (केरळ). 165 वरील :  1)सचिन चौहान (उत्तरप्रदेश), 2)युवराज जाधव (महाराष्ट्र), 3)आशिश (कर्नाटका), 4)जतीन खत्री (दिल्ली), 5)आर. रजनीत (तेलंगणा).

महिला स्पोर्ट्स मॉडेल फिजिक्स : 155 सेंटीमीटर आतील

1) श्रेयासी सी मुखर्जी (पं. बंगाल), 2)सलोनी नाग (झारखंड), 3)पुजा भट्ट (उत्तराखंड), 4)शिली दिनेश काकोडकर (जीबीबीए). 155 सेंटीमीटरवरील : 1)संजुराणी (सेंट्रल रेव्हीणू), 2)इलंगा याजाक (अरूणाचल प्रदेश), 3)चित्रा नागदा पांडे (उत्तरप्रदेश), 4)भूमीका एस. कुमार (केरळ), 5)अस्मिता शहा (उत्तराखंड) यांनी विजेतेपद पटकाविले.

Advertisement
Tags :

.