For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Antroli | अंत्रोळी प्रीमियर लीगचा जल्लोष; टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

01:13 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
antroli   अंत्रोळी प्रीमियर लीगचा जल्लोष  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
Advertisement

                हनुमान जन्मोत्सवानिमित्त अंत्रोळीमध्ये क्रिकेटचा उत्सव

Advertisement

अंत्रोळी (समीर शेख ) : जय हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त अंत्रोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अंत्रोळी प्रीमियर लीग (APL) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज (दि. ३ एप्रिल) उत्साहात पार पडले. पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणारी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात रंगणार आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक रु. २०,५५५ (उद्योगपती गणेश कोळी), द्वितीय पारितोषिक रु. १५,५५५ (विनय आपटे), तृतीय पारितोषिक रु. ११,५५५ (विलास भालगावकर सर) व चतुर्थ पारितोषिक रु. ५,५५५ (रमेश आण्णा आसबे) अशी ठेवण्यात आली आहेत. विजेत्या संघांना गणपत कुंभार यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात येणार असून इतर बक्षिसे क्रिकेटर क्लब, ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमींकडून देण्यात येणार आहेत. या क्रिकेट स्पर्धेत पंचक्रोशीतील २५ टीमने सहभाग घेतला आहे.

Advertisement

उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. वंसतराव आपटे, कै. नानासाहेब अंत्रोळीकर, कै. गिरीष ञंयत आपटे, कै. अजय अंत्रोळीकर व कै. अनिल कोळी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. हे पूजन पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ, माजी उपसरपंच मजनोद्दीन पठाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडले. तसेच मैदानाचे पूजनही संतोष शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी अंत्रोळी व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्पर्धेसाठी जितेंद्र थोरात, सर्जेराव शिंदे, बिरू शिंदे, अशोक हजारे, डॉ. विलास भालगावकर, राम कोळी, सिद्धू माने यांचे सहकार्य लाभत आहे. तर दादा शिंदे, आप्पू कोळी, श्रीकांत कोकरे, सागर थोरात, बिरू कर्वे, विशाल बंडगर, प्रशांत सलगरे आदी सदस्य आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

Advertisement
Tags :

.