For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात अँटीबायोटिक

06:47 AM Jun 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात अँटीबायोटिक
Advertisement

अध्ययनात झाला घाबरविणारा खुलासा

Advertisement

सौम्य संक्रमण होताच अँटीबायोटिक औषधे घेतली जात असतात. यापूर्वीच्या अनेक अध्ययनांमध्ये अँटीबायोटिक्सच्या वाढत्या वापरामुळे अँटीबायोटिक रेजिस्टेंसच्या धोक्यासंबंधी सतर्क करण्यात आले आहे.  मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक औषधे देणे टाळावे असे आरोग्यतज्ञांच्या एका टीमने म्हटले आहे. या औषधांचा अधिक वापर भविष्यात अनेक प्रकारच्या क्रॉनिक आजार म्हणजेच मधुमेह-रक्तदाब तसेच कॅन्सरचा धोका वाढविणारा ठरू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. अँटीबायोटिकच्या अधिक वापरावरून (विशेषकरून मुलांमध्ये) काळजी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे म्हणत अध्ययनकर्त्यांच्या टीमने डॉक्टरांनाही सावध केले आहे.

मुलांमध्ये वाढतेय स्थुलत्व

Advertisement

एका नव्या अध्ययनात बालपणी संक्रमणाशी लढण्यासाठी सामान्य औषधांच्या अधिक वापरामुळे मुलांमध्ये स्थुलत्वाची शक्यता वाढत असल्याचे दिसून आले आहे. फिनलंडच्या संशोधकांना ज्या मुलांनी वयाच्या दोन वर्षांपूर्वी अँटीबायोटिक्स घेतले होते, त्यांच्यात 12 वर्षांच्या वयापर्यंत स्थुलत्वाची (हाय बॉडी मास इंडेक्स)शक्यता 20 टक्के अधिक असल्याचे आढळून आले. तर ज्या मुलांनी या वयापर्यंत कधीच किंवा अँटीबायोटिक्स औषधांचा अत्यंत कमी वापर केला, त्यांच्यात स्थुलत्वाचा धोका कमी होता. तर दोन वर्षांपर्यंत कमी वयाच्या ज्या मुलांना अँटीबायोटिक्स देण्यात आले, त्यांच्यात इयत्ता पाचवीपर्यंत पोहोचेपर्यंत अधिक वजनाची जोखिम खुपच अधिक होती.

अँटीबायोटिक्सचा सर्रास वापर

केवळ ब्रिटनमध्ये दरवर्षी 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीबायोटिक्सच्या जवळपास 40 लाख प्रिस्क्रिप्शन देण्यात येतात असे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले. ही औषधे सर्वसाधारणपणे बॅक्टेरियल संक्रमण म्हणजेच गळ्यात खवखव, निमोनिया आणि गॅस्ट्रोएंटेराइटिस, त्वचा आणि कानाच्या संक्रमणावरील उपचारासाठी देण्यात येतात. तज्ञांनी यापूर्वीही अँटीबायोटिक्सची मर्यादा निश्चित करण्याची मागणी केली होती. या औषधांचा वापर अधिक करण्यात येत राहिल्यास ही औषध काळासोबत स्वत:ची शक्ती गमावू शकतात आणि त्यांच्याद्वारे सामान्य संक्रमणावर उपचार करणे देखील अशक्य ठरू शकते असा इशारा यात देण्यात आला होता. औषधे घेण्यामुळे आणखी आरोग्य जोखीम आहे हे विचारात घेतले जावे असे फिनिश वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

अध्ययनात काय कळले?

24 महिन्यांच्या बाळांना अँटीबायोटिक्स दिल्याने वयाच्या 7 वर्षांपर्यंत बीएमआय अधिक होऊ शकतो. हे नंतरच्या जीवनात आणखी अनेक समस्यांचे कारण ठरू शकतो असे संशोधकांना अध्ययनात आढळून आले. अध्ययनासाठी तज्ञांनी फिनलंडमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या 33,095 मुलांच्या डाटाचे व़िश्लेषण केले, यात जीवनातील पहिल्या दोन वर्षांमध्ये अँटीबायोटिक्सच्या वापरावर नजर ठेवण्यात आली. संशोधकांनी गर्भावस्थेपूर्वी, गर्भावस्थेदरम्यान आणि जन्मावेळी अँटीबायोटिकच्या वापरावरही नजर ठेवली. गर्भावस्थेपूर्वी, गर्भावस्थेदरम्यान किंवा प्रसुतीवेळी अँटीबायोटिक औषधे घेतल्याने बाळाच्या वजनात कुठलाच फरक पडला नाही. परंतु ज्या मुलांनी पहिल्या दोन वर्षांमध्ये ही औषधे घेतली होती, त्यांच्यात स्थुलत्वाची जोखीम अधिक होती असे दिसून आले.

डॉक्टरांनी घ्यावी खबरदारी

छोट्या मुलांसाठी अँटीबायोटिक्स सुचविताना खबरदारी घेतली जावी, खासकरून श्वसनविषयक संक्रमणादरम्यान. याचबरोबर आईवडिलांनी छोट्या छोट्या समस्यांसाठी या औषधांच्या वापरावरून सतर्क रहायला हवे असे फिनलंड येथील ओउलू विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.