For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्मविरोधी टिप्पणी, लैंगिक अत्याचार... "TCS चं नाशिक कार्यालय महिलांसाठी विषारी" महिला आयोगाचा अहवाल काय सांगतो?

02:33 PM May 12, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
धर्मविरोधी टिप्पणी  लैंगिक अत्याचार     tcs चं नाशिक कार्यालय महिलांसाठी विषारी  महिला आयोगाचा अहवाल काय सांगतो
Tata consultancy services
Advertisement

TCS Nashik is not safe for womens | TCS अर्थात 'टाटा कन्संटन्सी सर्विसेस'चे नाशिकचे कार्यालय महिलांसाठी योग्य नसल्याची टिप्पणी राष्ट्रीय महिला आयोगाने आज केली.  राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) सोमवारी टीसीएसच्या नाशिक कार्यालयावर एक तीव्र टीकात्मक अहवाल जारी केला असून, या कार्यालयात महिलांसाठी अत्यंत विषारी आणि असुरक्षित कामाचे वातावरण असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

आयोगाच्या तथ्य-शोध समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कार्यालयात लैंगिक छळ, धार्मिक अवमान, मानसिक छळ आणि दहशतीचे वातावरण कायम होते. एका विश्वासार्ह तक्रार निवारण यंत्रणेच्या अभावामुळे अनेक महिला कर्मचारी तक्रार करू शकत नव्हत्या.

आयोगाने नेमके काय म्हटले

Advertisement

चौकशी केलेल्यता काही प्रकरणात आतापर्यंत बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप असलेले नऊ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत . पोलिसांनी नऊ आरोपींना अटकही केली आहे. आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन तपास सुरू केला. अलीकडेच, आरोपी निदा खान हिलाही अटक करून २४ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अहवालात आणखी काय म्हटले?

एनसीडब्ल्यूने सांगितले की, चौकशी समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे माजी डीजीपी बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि एनसीडब्ल्यूच्या वरिष्ठ समन्वयक लीलावती यांचा समावेश होता. समितीने १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी नाशिकला भेट देऊन पीडित, टीसीएस पॉश समिती, पोलीस अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५० पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला .

हिंदुत्वविरोधी टिप्पणी केल्याचाही आरोप आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आरोपीने महिलांसमोर हिंदू धर्माबद्दल अपमानजनक टिप्पणी केली आणि धार्मिक दबावाचे वातावरण निर्माण केले. आयोगाच्या मते, महिला कर्मचारी, विशेषतः 'जनरेशन झेड' गटातील महिला, या प्रकारच्या मानसिक आणि धार्मिक छळाने विशेषतः प्रभावित झाल्या होत्या. अहवालात असेही म्हटले आहे की, कार्यालयातील सततचा पाठलाग, दादागिरी आणि अपमानास्पद वागणुकीमुळे महिलांमध्ये मानसिक खच्चीकरण होत होते.

Advertisement
Tags :

.