महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात लाळ्या प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ

10:52 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गावोगावी मोहीम : चार महिन्यांवरील सर्व जनावरांना टोचणार लस : सहकार्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात लाळ्या-खुरकत लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. चार महिन्यांवरील सर्व जनावरांना ही प्रतिबंधक लस टोचली जात आहे. घरोघरी जावून सर्व जनावरांना लस दिली जात आहे. पशुपालक शेतकऱ्यांनी मनात कोणताही संकोच न ठेवता जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे. जिल्ह्यात 13 लाख 93 हजार 700 इतकी जनावरांची संख्या आहे. यापैकी गाय, म्हैस, बैल, या जनावरांना लस दिली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबतच्या सर्व सूचना केल्या असून एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. अलिकडे जनावरांना लम्पी, लाळ्या-खुरकत, ब्रुसेलोसीस आदी रोगांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे. लाळ्या-खुरकत रोगाची लागण झाल्यास जनावराच्या तोंडाला पुरळ उठून ते असह्या होते. रोगाची तीव्रता अधिक असल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. विशेषत: हा रोग संसर्गजन्य आहे. यामध्ये पशुपालकांना मोठा आर्थिक फटकाही बसू शकतो. यासाठी सर्व जनावरांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. मात्र काही पशुपालकांच्या मनामध्ये गैरसमजती अधिक असतात. त्यामुळे काही जनावरे लसीकरणापासून वंचित राहतात. यासाठी गैरसमज न ठेवता सर्व जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे.

Advertisement

एकही जनावर वंचित राहणार नाही, याची काळजी घेणार

जिल्ह्यात सर्वत्र लाळ्या-खुरकत प्रतिबंधक मोहिमेला प्रारंभ झाला आहे. चार वर्षांवरील सर्व जनावरांना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनीही या मोहिमेला सहकार्य करावे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे पुरेसा लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article