For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात

06:07 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारत पाकिस्तान सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात
Advertisement

बीएसएफ महासंचालकांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शेजारील देशाकडून होणाऱ्या वाढत्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केली आहे. या सिस्टीममध्ये हँड-होल्ड स्टॅटिक, व्हेईकल-माउंटेड अँटी-ड्रोन सिस्टीमचा समावेश आहे. एवढेच नाही तर सीमेवर लावण्यात आलेले फ्लड लाईट्स बदलून एलईडी लावले जात आहेत. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी 59 व्या बीएसएफ दिनानिमित्त हजारीबागमध्ये ही माहिती दिली.

Advertisement

गेल्या वषी 1 नोव्हेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान पश्चिम सीमेवर 90 ड्रोन जप्त करण्यात आले होते. त्यापैकी 81 पंजाबमधून आणि 9 राजस्थानमधून जप्त करण्यात आले आहेत. पश्चिम सीमेवर फील्ड युनिट्सने जप्त केलेल्या 81 ड्रोनचे विश्लेषण करण्यासाठी दिल्लीच्या टिगरी पॅम्पमध्ये ड्रोन फॉरेन्सिक लॅब तयार करण्यात आली आहे. या लॅबमधून मिळालेले निकाल संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना शेअर केले जात आहेत.

सीमेपलीकडे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बीएसएफने बायोमेट्रिक मशीन बसवण्याचे कामही सुरू केले आहे. त्यासाठी पंजाबच्या सीमेवर कुंपण उभारण्यापूर्वी दुसऱ्या बाजूला जमीन असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. सीमेच्या अतिसंवेदनशील भागात भारत-बांगलादेश सीमेवर कुंपणावर उंच तारांचे जाळीचे कुंपण आणि जाळी आहे. सुंदरबन प्रदेशात, तात्पुरत्या सीमा चौक्मया, माउंटेड पेट्रोलिंग आणि वाहन गस्त या सर्व 4 भागात तैनात केले जात आहे.

देशाच्या उर्वरित आंतरराष्ट्रीय सीमेवर इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स ऑफ व्हल्नेरेबल पॅच प्रकल्प सुरू आहे. हे पाकिस्तान, बांगलादेश सीमेला लागून असलेल्या 7 सीमांच्या जबाबदारीच्या क्षेत्रात म्हणजेच जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर-दक्षिण बंगाल आणि गुवाहाटी येथे स्थापन केले जात आहे. 635 असुरक्षित पॅचपैकी 328 चे काम पूर्ण झाल्याची माहिती बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी दिली.

Advertisement
Tags :

.