महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये ड्रोनविरोधी मशीनगनचा होणार वापर

06:04 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्र सरकारने दिली मंजुरी : विष्णूपूरमध्ये रॉकेट बॉम्ब हल्ल्यात 1 ठार, 3 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

केंद्र सरकारने पहिल्यांदाच मणिपूरमध्ये ड्रोनविरोधी मीडियम मशीनगनच्या वापराला मंजुरी दिली आहे. हा निर्णय 1-3 सप्टेंबरदरम्यान राज्यात झालेल्या दोन ड्रोन हल्ल्यांदरम्यान घेण्यात आला आहे. राज्यात मे 2023 पासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान हिंसा सुरू आहे.

इंफाळ जिल्ह्यातील सेजम चिरांग गावात 3 सप्टेंबर रोजी कुकी उग्रवाद्यांनी ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात एका महिलेसमवेत 3 जण जखमी झाले होते. तर 1 सप्टेंबर रोजी कोत्रुक गावात देखील ड्रोनहल्ला करण्यात आला होता. यात दोन जणांचा मृत्यू तर 9 जखमी झाले होते.

कुकी उग्रवाद्यांना ड्रोन वॉरफेयरसाठी म्यानमारमधून तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण मिळत असल्याची भीती व्यक्त होत आहे. मणिपूर सरकारने या ड्रोन हल्ल्यांच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

मणिपूरच्या विष्णूपूरमध्ये शुक्रवारी उग्रवादी समुहाने रॉकेट बॉम्बद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा एका दिवसात दुसरा रॉकेट बॉम्ब हल्ला आहे. तर शुक्रवारी सकाळी मोइरंग येथून 4 किलोमीटर अंतरावरील ट्रोंगलाओबी भागात रॉकेट बॉम्ब कोसळला होता. यात दोन इमारतींचे नुकसान झाले होते. या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये दहशत फैलावली आहे.

पर्वतीय भागात सुरक्षा दल तैनात

ड्रोन हल्ला ही एक नवी घटना असून आम्ही ती अत्यंत गांभीर्याने घेत आहोत. दिल्लीत एनएसजीचे महासंचालक आणि त्यांच्या टीमसोबत आम्ही चर्चा केली आहे. आणखी अनेक तज्ञ देखील येत आहेत. आम्ही ड्रोनहल्ल्यांचा तपास आणि ते रोखण्यासाठी एक समिती स्थापन केली असल्याची माहिती मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह यांनी दिली आहे. ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आमच्याकडे काही उपाय असून ते आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करत आहोत. याचबरोबर ज्या पर्वतीय भागांमधून हल्ले झाले, तेथे मोहीम हाती घेण्यात आली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारकडून पूर्ण समर्थन मिळत आहे. केंद्रीय सुरक्षादलांच्या सुमारे 198 तुकड्या तेथे तैनात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article