तांदाच्या 6 प्रजातींमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म
ब्ल्यूबेरीइतके शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट
वैज्ञानिकांनी तांदळाच्या 6 अशा प्रजातींची ओळख पटविली आहे, ज्यात कॅन्सरशी लढणारे नैसर्गिक गुण आढळून आले आहेत. या तांदळामध्ये शरीराला नुकसान पोहोचविणाऱ्या घटकांपासून रक्षण करणारे अँटी-ऑक्सिडेंट देखील आहेत. हा शोध भारत आणि चीनसारख्या आशियाई देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण येथे मोठ्या संख्येत लोक कोलोरेक्टल कॅन्सरसारख्या आजारांनी प्रभावित होत आहेत.
फिलिपाईन्स येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या (आयआरआरआय) वैज्ञानिकांनी याचा खुलासा जगातील विविध हिस्स्यांमध्ये जमविण्यात आलेल्या तांदळाच्या 1.32 लाख नमुन्यांच्या सखोल तपासणीनंतर केला आहे. यातील सुमारे 800 रंगबिरंगी तांदळाची निवड करण्यात आली आणि त्यांचे रासायनिक घटक अन् शरीरावरील प्रभावाचे परीक्षण करण्यात आले.
या प्रक्रियेत 6 अशा प्रजाती समोर आल्या, ज्यात अत्याधिक प्रमाणात कॅन्सरप्रतिबंधक आणि अँटी-ऑक्सिडेंट घटक आढळून आले, जे ब्ल्यूबेरी आणि चिया सीड्स सारख्या महाग सुपरफूडमध्ये आढळून येणाऱ्या अँटीऑक्सिडेंट गुणांसमान होते. जेव्हा या प्रजातींचे कॅन्सर पेशींवर परीक्षण करण्यात आले असता त्यांनी अत्यंत उच्च स्तराच्या कॅन्सरप्रतिबंधक गुणांचे प्रदर्शन पेले. या संशोधनाचे निष्कर्ष सायंटिफिक जर्नल फूड हायड्रोकोलॉइड्स अँड हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
अर्क कॅन्सर विरोधात अत्यंत प्रभावी
या तांदळाच्या प्रजातींमधून निर्मित चोकरचा अर्क अत्यंत प्रभावी आहे आणि हे पाण्यात सहजपणे विरघळून जाते. या अर्कातून तयार पोषक मिश्रण (सप्लिमेंट)चे किंचित प्रमाणही कॅन्सर पेशींना रोखण्यास उपयुक्त ठरले आहे. सुमारे 300 ग्रॅम चोकरपासून एक किलोपर्यंत पोषक मिश्रण तयार केले जाऊ शकते. मूल्य आणि खर्चाच्या दृष्टीकोनातून देखील हे अत्यंत स्वस्त आहे. या अर्काच्या माध्यमातून अनेक प्रकारचे पोषक मिश्रण सप्लिमेंट तयार केले जाऊ शकतात. तर संबंधित प्रजातींचा भात तयार केल्यावर यात सुमारे 70 टक्के कॅन्सरविरोधी किंवा अँटीऑक्सिडेंट गुण कायम राहतात.
वृद्धांमध्ये वेगाने फैलावतोय त्वचेचा कॅन्सर
जगभरात वृद्धांसाठी त्वचा कॅन्सर एक नवा आणि वेगाने वाढणारे आरोग्य आव्हान ठरले आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक दराने वाढत असून यात पुरुषांची हिस्सेदारी महिलांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी एका आंतरराष्ट्रीय अध्ययनात हा चकित करणारा खुलासा केला असून यात 204 देशांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. यातून केवळ 2021 मध्येच वृद्धांमध्ये त्वचेच्या कॅन्सरचे 44 लाख नवे रुग्ण नोंद झाले होते. चीनच्या चोंगकिंग मेडिकल युनिव्हर्सिटीच्या तज्ञांकडून करण्यात आलेल्या संशोधनात त्वचा कॅन्सरचे तीन प्रमुख प्रकार मेलानोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि बेसल सेल कार्सिनोमावर 1990-2021 पर्यंतच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. यासंबंधीचे अध्ययन प्रतिष्ठित जामा डर्मेटोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.