कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत अणसुरचे सद्गगुरु प्रासादिक मंडळ प्रथम

12:42 PM Sep 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली/वार्ताहर

Advertisement

पारंपरिक कलेला चालना देत तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने सोमवार,२२ सप्टेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भजन मंडळांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेला स्थानिक नागरिकांसह भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकत सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ,अणसुर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी यांनी प्रभावी सादरीकरण करून तृतीय क्रमांक पटकावला.स्पर्धेदरम्यान विविध प्रकारच्या गायन व वाद्यवादन सादरीकरणांनाही स्वतंत्र पारितोषिके देण्यात आली. त्यामध्ये –
उत्कृष्ट प्रार्थना ( हर्षल मेस्त्री )
जय जय राम ( योगेश मेस्त्री )
रूपक ( अमोल मांजरेकर )
गजर (भूषण घाडी )
अभंग (क्र. १) : योगेश मेस्त्री
अभंग (क्र. २) : कौस्तुभ धुरी
गौळण (सत्यनारायण कळंगुटकर )
ज्ञानेश्वर माऊली गजर (जैन महालक्ष्मी भजन मंडळ,वालावल ) वाद्य व सहगायन गटात विशेष.पारितोषिके पुढीलप्रमाणे---
शिस्तबद्ध मंडळ ( श्री देवी माऊली भजन मंडळ, सातोसे ) उत्कृष्ट गायक ( सत्यनारायण कळंगुटकर ) उत्कृष्ट सहगायक ( दीपक मेस्त्री, वालावल ) उत्कृष्ट कोरस ( लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली ) उत्कृष्ट झांज वादक ( लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली ) उत्कृष्ट तबलावादक (काजरोबा भजन मंडळ,कवठणी )उत्कृष्ट पखवाज वादक ( जैन महालक्ष्मी भजन मंडळ,वालावल )उत्कृष्ट हार्मोनियम वादक (काजरोबा भजन मंडळ,कवठणी ) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. परीक्षक म्हणून रुपेंद्र परब व सुरज परब यांनी काम पाहिले. त्यांच्या काटेकोर परीक्षणातून विजेते निवडण्यात आले.ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता,पारंपरिक भजन परंपरेचा जतन व संवर्धन करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. विविध गायक, वादक व भजन मंडळांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे भजन परंपरेला नवी ऊर्जा मिळाल्याचे भजनप्रेमींनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article