आणखी एका ‘वॉन्टेड’चा पाकिस्तानमध्ये खात्मा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी युनूस खान याची पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. युनूस हा जैश-ए-मोहम्मदचा कमांडर असून तो दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याप्रकरणी भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समाविष्ट होता. तो तऊणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देत असे.
दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आता स्वत:च दहशतवादाचा बळी ठरत आहे. रोज कुठे ना कुठे दहशतवादी हल्ले होत आहेत. अनेक संघटना तेथील लष्कर आणि पोलिसांच्या चौक्मयांवर हल्ले करत आहेत. दरम्यान, भारताविऊद्ध विष ओतणारे आणि दहशतवादी कारवायांचे कट रचणारे इस्लामिक चेहरेही तेथे मारले जात आहेत. गेल्या 3 महिन्यात भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले 7 दहशतवादी मारले गेले आहेत. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात तीन प्रमुख एलईटी/जेएम दहशतवादी पाकिस्तानमध्ये मारले गेले. आता नव्या घटनेत पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी युनूस खान याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. युनूस खान हा पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता.