For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hatkanangale News | ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी; हातकणंगलेत २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

11:55 AM Apr 23, 2026 IST | NEETA POTDAR
hatkanangale news   ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी  हातकणंगलेत २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
Advertisement

                   ऑनलाईन गेमिंगच्या तोट्यातून तरुणाची आत्महत्या

Advertisement

हातकणंगले -ऑनलाईन गेमिंगमधील मोठ्या आर्थिक नुकसानीतून नैराश्याला बळी पडत एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. मजले (ता. हातकणंगले) येथे बुधवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. दर्शन महावीर पाटील (वय २६, रा. भोम्मान्ना मळा, मजले) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दर्शन पाटील रोपवाटिकेचा व्यवसाय सांभाळत होता. मात्र, ऑनलाईन गेममध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे तो मानसिक तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधबार(दि. २२) रोजी सकाळी सुमारे ९ बाजण्याच्या सुमारास दर्शनने विषारी औषध प्राशन केले.

Advertisement

ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करण्याचे काम हातकणंगलेपोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.या घटनेमुळे 'ऑनलाईन गेमिंगचा बाढता विळखा तरुणांच्या जीवावर बेततोय का?' असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Tags :

.