महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘स्मार्ट सिटी’च्या कामात आणखी एकाचा बळी

11:18 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मळा-पणजी येथील महादेव नाईक यांचा गटारात पडून मृत्यू : पणजी शहरात संतापाची लाट,दोन महिन्यांत दुसरी घटना

Advertisement

पणजी : गेली सात वर्षे पणजी शहरात अनेक ठिकाणी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत कामे सुरू आहेत. या कामात मळा-पणजी येथील महादेव (आप्पा) नाईक यांचा बळी गेला आहे. दोन महिन्यांतील ही दुसरी घटना असून, या दोन्ही घटनांमध्ये दोघांचा जीव गेलेला आहे. या अपघाताची पणजी पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. याबाबत माहिती अशी की, मळा-पणजी भागातील एनजीपीडीए कार्यालयाच्या समोरील उघड्या असलेल्या गटारात महादेव (बाप्पा) नाईक (वय 60) हे पडले. या घटनेत त्यांना मोठी दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेले आर्यन नाईक व त्याचा मित्र द्रविड यांनी क्षणाचाही विलंब न करता महादेव नाईक यांना गटारातून वर काढले. त्यांनी 109 ऊग्णवाहिकेला तत्काळ बोलावून त्यांना बांबोळी इस्पितळात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा या अपघातात मृत्यू झाला. या गटारावरील लाद्या ह्या स्मार्ट सिटीच्या कामांसाठी काढलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरू असतानाही बॅरिकेड मोडलेले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले आहेत. हे बॅरिकेट सुरक्षित असते तर कदाचित महादेव नाईक यांचा जीव वाचला असता. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने पणजी शहरातील लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली आणखी किती जीव घेणार आहात, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. या कामाचे अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी आतातरी भ्रष्ट कामाबाबत कबुली द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Advertisement

महादेव नाईक यांच्या मृत्यूने हळहळ

महादेव उर्फ बाप्पा नाईक हे मळा-पणजी येथील रहिवासी असून, ते सर्वांमध्ये मिळून-मिसळून असायचे. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणाहून ते नेहमी ये-जा करीत असत. येणाऱ्या-जाणाऱ्यांशी नेहमी हस्तांदोलन करीत असल्यामुळे महादेव नाईक यांच्या निधनाची वार्ता कळताच हळहळ व्यक्त करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या कामासाठी गटारावरील लाद्या उघड्या ठेवल्याने हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले.

विधानसभा अधिवेशनात विषय पेटणार

यापूर्वी स्मार्ट सिटीच्या कामामुळे चेंबरमध्ये पडून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पणजीतील एकाचा बळी गेला होता. आता घडलेली ही दुसरी घटना असल्याने स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. त्यामुळे महादेव (बाप्पा) नाईक यांच्या मृत्यूबाबत विधानसभेत विरोधक आवाज उठवण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article