गणपतीसाठी कोकणला आणखी एक अनारक्षित रेल्वे गाडी
मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सव तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा गोंधळ सुऊ असताना कोकण रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आणि रेल्वेची तिकिट मिळण्याची शक्यता उरली नसताना कोकण रेल्वे प्रशासने सोशल मीडियावर पोस्ट करत नव्या अनारक्षित गाडीची माहिती दिली आहे.
कोकण रेल्वेच्या एक्स अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. ही एक गणपती विशेष रेल्वे असून 20 डब्यांची गाडी क्रमांक 01103/01104 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून कुडाळ आणि पुन्हा सीएसएमटी असा पूर्ण प्रवास करेल. गाडी क्रमांक 01103 मुंबई छशिमट कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन त्यांच्या ठरलेल्या स्थानकातून 4 तसेच 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कुडाळच्या दिशेने जाणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता कुडाळला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01104 कुडाळ-मुंबई छशिमट (विशेष) अनारक्षित निर्धारित स्थानकातून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता प्रवास सुरू करून त्याच दिवशी सायंकाळी 4.40 वाजता मुंबईत पोहोचेल. अधिकृत माहितीनुसार या गाडीला 20 डब्बे असून त्यापैकी 14 कोच जनरल श्रेणीतील असतील, तर चार कोच स्लीपर असतील. ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून, कामाठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.