For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलमान खान गोळीबारप्रकरणी आणखी एक संशयित अटकेत

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलमान खान गोळीबारप्रकरणी आणखी एक संशयित अटकेत
Advertisement

हरियाणातून ताब्यात, पोलिसांकडून कसून तपास

Advertisement

वृत्तसंस्था /चंदीगड

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील निवासाबाहेर झालेल्या गोळीबारात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. तपास अधिकाऱ्यांनी हरियाणातून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. यापूर्वी अटक करण्यात आलेले दोघे हल्लेखोर गोळीबाराच्या घटनेपूर्वी कोणकोणाच्या संपर्कात होते याची माहिती जाणून घेत संबंधिताला अटक करण्यात आली. आता अटक करण्यात आलेला तिसरा संशयित तुऊंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचा संशय एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला. त्यादृष्टीने सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात या संशयिताची भूमिका काय होती याचा आता पोलीस तपास करत आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर काही वेळाने अनमोल बिश्नोई याने फेसबुकवर कथित पोस्ट केल्याची माहिती आहे. रविवारी, 14 एप्रिल रोजी झालेल्या या गोळीबारात पोलिसांनी 16 एप्रिलच्या रात्री उशिरा गुजरातमधील कच्छ येथून सागर श्रीजोगेंद्र पाल आणि विकी साहेब गुप्ता या दोन आरोपींना अटक केली होती. सागर आणि विकी गुप्ता हे ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांच्या कारवायांची माहिती देत होते. माहिती देण्यासाठी तो इंटरनेट कॉलचा वापर करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.