For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम

06:19 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम
Advertisement

युट्यूबवर 2 कोटी सब्सक्रायबर्स असणारे एकमेव नेते

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकप्रियतेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे शिखर गाठले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या युट्यूब चॅनेलच्या सब्सक्रायबर्सची संख्या आता 2 कोटीपर्यंत पोहोचली आहे. या युट्यूब चॅनेलवर पंतप्रधान मोदींच्या संबोधनाचे व्हिडिओ अपलोड केले जातात. तसेच थेट प्रसारण देखील या चॅनेलवर पहायला मिळते.

Advertisement

युट्यूबवर सब्सक्रायबर्स आणि ह्यूज प्रकरणी पंतप्रधान मोदींनी जगातील सर्व नेत्यांना खूपच मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनेलवर एकूण 450 कोटी ह्यूज आहेत. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये मोदींच्या चॅनेलच्या सब्सक्रायबर्सची संख्या 1 कोटीहून अधिक झाली होती. मोदींच्या चॅनेलवर सर्वात लोकप्रिय तीन व्हिडिओ असून त्यांचे एकूण ह्यूज 175 दशलक्ष इतके आहेत. पंतप्रधान मोदींनंतर ब्राझीचे माजी अध्यक्ष जायर बोल्सोनारो असून त्यांच्या चॅनेलवर 64 लाख सब्सक्रायबर्स आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की तिसऱ्या स्थानी असून सब्सक्रायबर्सची संख्या 11 लाख आहे.

याचबरोबर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पंतप्रधान मोदींची मोठी फॅन फॉलोइंग आहे. पंतप्रधान मोदींच्या एक्स अकौंटवर 94 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 82.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर मोदींचे 48 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. अलिकडेच जाहीर झालेल्या जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींना अव्वल स्थान मिळोल होते. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी मॉर्निंग कंसल्टच्या एका सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे 76 टक्क्यांच्या अप्रूवल  रेटिंगसह सर्वात लोकप्रिय जागतिक नेते ठरले आहेत. या सर्वेक्षणात दुसऱ्या स्थानावर मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर असून त्यांना 66 टक्के रेटिंग मिळाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे 37 टक्के अप्रूवल रेटिंगसोबत 8 व्या स्थानावर आहेत. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी 41 टक्के रेटिंगसोबत 6 व्या स्थानावर राहिल्या.

Advertisement
Tags :

.